त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने एकवीरा आई मंदिरात पणत्यांची आकर्षक रोषणाई

नवी मुंबई -:एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते व कार्तिक पौर्णिमेला विवाहाचा शेवटचा दिवस मानला जातो. याच दिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी सणाची सांगता होते. कार्तिक पौर्णिमेलाचा साधारणतः त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या असुराचा वध केला होता, म्हणूनच हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. आणि याच अनुषंगाने आगरी कोळी लोकांची आराध्य दैवत ,कार्ला गडावरील श्री एकवीरा आई मंदिरात नवी मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष रेखाताई पाटील यांच्या माध्यमातून सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी आकर्षक अशी पणत्यांची रोषणाई  करण्यात आली होती.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई मनसेचे महालँड कंपनी विरुद्ध