जागतिक कर्करोग दिनानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रिक्षाचालकांची मोफत कर्करोग तपासणी

नवी मुंबई : - कर्करोगाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी व सामान्य नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी साक्षरता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण संघटने तर्फे जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. दरवर्षी ४ फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी आणि लोकांना याबद्दल शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या जीवघेण्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी जगभरातील प्रत्येकाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. जगभरात दरवर्षी ८.२ दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो. तथापि कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल गोष्टी टाळणसाठी निरोगी जीवनाचा अवलंब केला पाहिजे तसेच नियमित तपासणी करणे गरजेचे आहे  म्हणूच नवी मुंबईत आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तर्फे रिक्षाचालकांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबीर आयोजित केले आहे. दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत हे शिबीर सुरु राहणार असून या शिबीरात तोंडाच्या कर्करोगाची तपासणी, डायबिटीस, उच्च रक्तदाब तसेच दातांची तपासणी करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे  याचे वाढते व्यसन लक्षात घेता तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त हे खास मोफत शिबीर आयोजित केले आहे. नवी मुंबई महानगर पालिका तसेच पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पुरुष व महिला रिक्षाचालक या शिबीरात सहभागी होऊ शकतात या शिबीरात भाग घेण्यासाठी रिक्षाचालक ९५९४९१०४७१ या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करू शकतात.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

न्हावा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसानभरपाईचे वाटप