उरण काँग्रेस मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही - महेंद्रशेठ घरत

उरण : उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते मोहन पाटील यांचे निधन झाले तर आठ दिवसांनी त्यांच्या विवाहित मुलीने आपल्या वडिलांच्या अकस्मित निधनाच्या धक्याने नैराश्य पोटी आत्महत्या केली. त्यामुळे मोहन पाटील यांच्या कुटुंबावर दुःखाचे आभाळ फाटले आहे.त्यांच्या घरात कमविणारे कोणीही नसल्याने त्यांच्यावर मोठ आर्थिक संकट सुद्धा आहे. म्हणून पूर्व विभाग काँग्रेस कमिटी व चिरनेर जिल्हा परिषद विभाग काँग्रेस कार्यकर्त्यांना आर्थिक मदतीची आर्त हाक देण्यात आली होती. विभागातील जिल्हा परिषद सद्स्य, सरपंच, उपसरपंच, व काँग्रेस कार्यकर्ते यांनी सढळ हस्ते या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. जेवढी मदत या माध्यमातून जमेल त्याच्या दुप्पट मदत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्रशेठ घरत  यांच्या यमुना शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल असे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत  यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी  पाणदिवे येथे दुःखी कुटुंबियांच्या घरी जाऊन एक लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या लहान मुलीकडे सुपूर्द केले व त्यांच्या मुलींच्या शैक्षणिक खर्च सुद्धा जिल्हा अध्यक्ष  महेंद्रशेठ घरत उचलणार आहेत. असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य  बाजीराव परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष  मिलिंदजी पाडगावकर, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते  मनोहर गावंड,रायगड जिल्हा अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष अखलाक शिलोत्री, जिल्हा सरचिटणीस गणेश सेवक,रायगड जिल्हा इंटक चे अध्यक्ष किरिट पाटील,घनश्याम पाटील, अलंकार परदेशी,आनंद ठाकूर, योगेश म्हात्रे,काशिनाथ गावंड, बाळकृष्ण म्हात्रे,मंगेश म्हात्रे, राजा भगत, महेंद्र पाटील, लंकेश ठाकूर, आदित्य घरत व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पालिकेच्या मालमत्ता करास नागरिकांचा प्रचंड विरोध