कोळी बांधवांना करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या निवडणूकीची प्रतिक्षा

जेएनपीटी : करंजा गावातील कोळी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्याचे शासनस्तरावर निराकरण करण्याचे काम करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु सदर सोसायटीचा कार्यकाळ मागील वर्षी संपुष्टात आल्याने कोळी बांधवांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी मुदत संपुष्टात आलेल्या करंजा मच्छिमार सोसायटीची निवडणूक केव्हा घोषित करते यांची प्रतिक्षा आता करंजा गावातील कोळी बांधवांना लागून राहिली आहे.

     करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये निवडून आलेले १७ सभासद हे करंजा गावातील कोळी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या अडीअडचणीचे सोसायटीच्या दर महिन्याच्या मासिक मिटिंगमध्ये तसेच शासनस्तरावर निराकरण करण्याचे काम हे सोसायटीच्या सभासद मधून निवडून आलेल्या चेअरमन व व्हा चेअरमन च्या माध्यमातून करत असतात. परंतु मागील वर्षी करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये निवडून आलेल्या सभासदांची मुदत संपुष्टात आल्याने या सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन व्यतिरिक्त व्हा.चेअरमन किंवा इतर सभासद हे फिरकत नाहीत.असे कोळी बांधवांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या अडीअडचणीचे गाऱ्हाणे कोणाकडे मांडावे असा प्रश्न कोळी बांधवांना वारंवार सतावत आहे.

    तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी मुदत संपुष्टात आलेल्या करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशी विनंती करंजा गावातील कोळी बांधव व्यक्त करत आहेत.यासंदर्भात करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सभासद हेमंत गौरीकर यांनी माहिती देताना सांगितले की करंजा सोसायटी मध्ये निवडून आलेल्या सभासदांची मुदत मागील वर्षी संपुष्टात आली आहे.हे खरे आहे.परंतु मुदत संपुष्टात आलेल्या इतर ठिकाणी जसे प्रशासक म्हणून कार्यभार हा त्या त्या ठिकाणचा शासकीय अधिकारी पाहत असतो.तसे येथे नाही. सोसायटीचे कामकाज हे शासनाचे प्रशासक न पाहता सोसायटीचे चेअरमन हेच कामकाज पाहत असतात.परंतु त्यांनाही निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे करंजा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशी आमची ही मागणी आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण काँग्रेस मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही - महेंद्रशेठ घरत