सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांच्या वेतन, भत्त्यांमध्ये वाढ करण्याची उत्तर रायगड जिल्हा भाजपची मागणी

पनवेल : रायगड जिल्हयातील सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी भाजप उत्तर रायगड जिल्हा कामगार आघाडी व जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्यावतीने रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचे समीर चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या संदर्भात निवेदन देताना भाजप उत्तर रायगड जिल्हा कामगार आघाडी आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, समीरा चव्हाण, रवींद्र कोरडे, ज्ञानेश्वर साखरे, चंद्रकांत कडू, मंगेश पाटील आदी उपस्थित होते. 

या संदर्भातील निवेदनात म्हंटले आहे कि, रायगड जिल्हा सुरक्षा मंडळामध्ये जवळपास अडीच हजार सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदीत सुरक्षा रक्षकांची पूर्वीच्या वेतनवाढीची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आलेली आहे.  सध्याच्या महागाईचा दर व  सुरक्षा रक्षक, अधिकारी यांच्या वेतनामध्ये फार तफावत आहे. त्यामुळे सदर सर्व नोंदीत सुरक्षा रक्षक, अधिकारी यांना आपले जीवनमान चालविणे कठीण होत आहे. या संदर्भात मागणीचा सकारात्मक विचार करून वेतन व भत्त्यांमध्ये ०१ जानेवारी २०२२ पासून सुधारणा करून त्याचा लाभ रायगड जिल्हयातील सुरक्षा रक्षक व अधिकारी यांना देण्यात यावा, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरची प्रत राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कामगार आयुक्त यांनाही देण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जागतिक कर्करोग दिनानिमित्त पोस्टर डिझाईन स्पर्धा