संविधानाबद्दल संक्षिप्त माहिती देणारे पुस्तक - ‘आपले भविष्य भारतीय संविधान'
सदर पुस्तक सुभाष वारे यांनी लिहिले असून, न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी प्रस्तावना लिहिली आहे. संविधानाबद्दल अधून मधून चर्चा सुरू असते. संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार कायम रहावेत, यासाठी नागरिकांना संविधानातील कलमांची माहिती असणे आवश्यक आहे ती या पुस्तकात आढळून येते.
भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाला संविधानाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा, अशी मागणी केली जाते. परंतु तूर्तास सदर मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे संविधानावरची जी काही पुस्तके उपलब्ध आहेत, त्याद्वारे संविधानाची माहिती जिज्ञासू नागरिकांना मिळू शकते. सदर पुस्तक एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या फाउंडेशनतर्फे ‘संविधान साक्षरता अभियान' राबविले जाते. त्या अंतर्गत संविधान परिचय अभ्यासक्रम, संविधान ओळख शिबिर व संविधान कार्यशाळा अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. जिज्ञासूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
सदर पुस्तक सुभाष वारे यांनी लिहिले असून, न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी प्रस्तावना लिहिली आहे. संविधानाबद्दल अधूनमधून चर्चा सुरू असते.
संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार कायम रहावेत, यासाठी नागरिकांना संविधानातील कलमांची माहिती असणे आवश्यक आहे. या पुस्तकात 'संविधान म्हणजे काय?', 'भारताचे संविधान कसे आणि कधी बनले?', 'संविधानाच्या प्रास्ताविकतेचे महत्त्व', 'संविधान दुरुस्तीच्या कलमाचा अर्थ', 'संविधानाने भारतीयांना दिलेले मूलभूत अधिकार', ‘एकरूप नागरी संहिता ( समान नागरी कायदा )', ‘गोवंश हत्या बंदी ', ‘र्धमनिरपेक्षतेचे राजकारण की धर्मनिरपेक्ष मुद्द्यांचे राजकारण', ‘मुस्लिम आरक्षण आणि भारतीय संविधान', ‘महिला आरक्षणाचा तिढा आपण कधी सोडविणार ?' , ‘मराठा- पटेल - जाट आरक्षणाची मागणी आणि संविधान', ‘केंद्र - राज्य संबंध', 'काश्मीरचा प्रश्न आणि ३७० वे कलम', 'भारतीय संविधाना समोरील आव्हाने' अशी एकूण २८ प्रकरणे आहेत. त्यात कायदा बनविताना कोणत्या अडचणी आल्या, त्या कायद्याचे महत्त्व, फायदे थोडक्यात सांगितले आहेत.
पुस्तकाचे नाव : आपले भविष्य भारतीय संविधान.
लेखक : सुभाष वारे. प्रकाशक : एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, पुणे
किंमत : शंभर रुपये
- रवींद्र जांभळे