समांतर चित्रपट चळवळीचा खंदा पाईक

आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही नामवंत दिग्दर्शक होऊन गेले. त्यामध्ये भारतातील दिगग्ज नामांकित चित्रपट निर्माते-  दिग्दर्शक आणि नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्याम बेनेगल यांचे नाव घेतले जाते. कलात्मक दृष्टी, तत्वनिष्ठा आणि वास्तवदर्शी कथानक सादरीकरणाची त्यांची शैली आजही चित्रपट जगतामध्ये अनुकरणीय मानली जाते. बेनेगल यांनी लघुपट, कॉफी रायटर निर्मितीपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

 श्याम बेनेगल यांनी जाहिरात विश्वात प्रदीर्घ काळ काम केले. हिंदुस्तान लिव्हरसाठी  जाहिरात लिहिली होती आणि तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ते हळूहळू वास्तवदर्शी चित्रपटांची निमिर्ती आणि दिग्दर्शनाकडे वळले. बेनेगेल यांनी  सन १९७४ मध्ये अंकुर चित्रपटापासून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात ग्रामीण भारतातील आर्थिक विषमता, स्त्री-पुरुष समानता आणि शोषणाचे विदारक चित्रण करणारा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरविला गेला. या चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख करून दिली. कारण कथानक मग ते हलके फुलके असो वा अगदीच गंभीर...ते तितक्याच सक्षमपणे हाताळणारे दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी मंथन, निशांत, भूमिका, मंडी यासारखे अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची धाटणी वेगळी असायची. प्रत्येक चित्रपटात भारतीय समाजातील विविध समस्या उलगडून दाखविण्यात यश मिळवले. कारण त्यांनी चित्रपटातून मांडलेली कथा, मुद्दे हे खरे विचार करायला लावणारे आणि मन सुन्न करणारे असायचे. कारण त्यांच्या चित्रपटांची विशेषतः ही होती की, ते सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य करणाऱ्या गोष्टींवर आधारित चित्रपट बनवून व्यापक अशी सामाजिक चौकट दिली. ती देतानाही त्यांनी कधी अवास्तव दावे केले नाहीत.

अंकुर पासून समांतर चित्रपटाचे युग सुरू झाले. पुढे त्याच्या प्रत्येक चित्रपटाततुन समांतर चित्रपट चळवळ सशक्तपणे रुजवण्यात अनोमल दिले होते. त्यामुळे बेनेगल यांना समांतर चित्रपटाचे जनक म्हटले जाते. असे असले तरी मुख्य प्रवाहातील भारतीय चित्रपटांपेक्षा वेगळी अशी समांतर चित्रपट चळवळीची खरी ओळख १९७० आणि १९८० च्या दशकात त्यांच्या वास्तववादी आणि प्रखर सामाजिक भाष्य करणाऱ्या चिञपटांमधून केली होती. समांतर चित्रपट म्हणजे समाजाच्या मूठभर बुद्धी प्रामाण्यवादी प्रेक्षकांसाठी असतात. या समाजाला बेनेगल यांनी धक्का देण्यात यध मिळविले. त्यामुळे समांतर चित्रपट चळवळीला मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला.बेनेगल यांची  भारत एक खोज' ही दूरदर्शनवरील मालिका गाजली होती. ही मालिका भारतीय इतिहासाचे अत्यंत विस्तृतपणे आणि समृद्ध चित्रण करणारी ठरली होती. बेनेगल  यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नवीन होतकरू लोकांना संधी दिली. त्यातून चित्रपटात एक नवी लाट निर्माण केली. त्यातूनच शबाना आझमी, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा, अमरीश पुरी  यांच्यासारखे अनेक कलाकार पुढे आले. असे असले तरी त्यांच्यातील अस्सल कलावंताची ओळख बेनेगल यांनी समर्थपणे रसिकांना करून दिली होती.

 बेनेगल यांनी २५ चित्रपट, १८ माहितीपट  पाच महापालिका, पाच लघुपट  बनविले. यातील नुसते विषयवैविध्य पाहिले तरी थक्क होतो. सन १९७६ मध्ये त्यांना पद्मश्री, १९९१ मध्ये कला क्षेत्रातील योगदान बद्दल पद्मभूषण या भारत सरकारच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक  पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. समांतर चित्रपटाच्या चळवळीच्या केंद्रस्थानी राहिलेले बेनेगल यांचे जाणे म्हणजे या चळवळीला मोठा धक्का देणारे आहे. त्यांच्या माध्यमातून प्रयोगशील चित्रपटांच्या चळवळीचा आधार दिला गेला होता. -सुनील कुवरे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मला भावलेले डॉ मनमोहन सिंग