‘सिडको'शी संबंधित प्रश्नांवर आ. मंदाताई म्हात्रे यांची चर्चा

नवी मुंबई : नवी मुंबई शहर झपाट्याने विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या नवी मुंबईत केलेल्या विकासकामांच्या जोरावर सन २०१४, २०१९ आणि आता २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत सलग ३ वेळा बेलापूर मतदारसंघातून निवडून येणाऱ्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. त्याअनुषंगाने १३ फेब्रुवारी रोजी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांची ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक-३ गणेश देशमुख यांच्या समवेत विविध प्रश्नांवर बैठक झाली. या बैठकीत प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आढावा  घेण्यात आला. याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक दीपक पवार, समाजसेवक विकास सोरटे, मनोहर बाविस्कर, कमळ शर्मा, बलवीरसिंग चौधरी, अशोक नाईक, जयवंत तांडेल, विजय नाईक, जयराम पासवान, महेंद्र नाईक, गणेश पाटील, शरद पाटील, अनंता नाईक, भागेश भोईर, भावेश नाईक, प्रवीण पाटील, रमेश नाईक तसेच प्रजापती मंदिर, सरस्वती धाम मंदिर, दुर्गा माता मंदिर, सेवालाल मंदिर, राम मंदिर, मंदिराचे विश्वस्त आणि सदस्य उपस्थित होते.  

बैठकीच्या सुरुवातीस नवी मुंबईमध्ये महत्वपूर्ण होत असलेल्या प्रकल्प संदर्भात आढावा  घेण्यात आला. तसेच बेलापूर, सीवुडस्‌, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, वाशी येथील विविध प्रश्नांवर सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. महिला बाल भवनाची निविदा पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रिया करणे, नवी मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांचे भूखंड धार्मिक स्थळांच्या दराप्रमाणे संस्थेच्या नावावर करणे आणि नवीन जे काही छोटे भूखंड आहेत, ते धार्मिक स्थळांसाठी आरक्षित ठेवणे, फुलपाखरु उद्यान उभारण्यासाठी सारसोळे पामबीच लगतचा १२ एकर भूखंड नवी मुंबई महापालिकाकडे हस्तांतरीत करणे, करावे गांव आणि करावे नगर परिसरातील तसेच दारावे गावातील रहिवाशांकरिता समाज मंदिरासाठी भूखंड उपलब्ध करणे, करावे गांव येथे मासळी मार्केट करिता भूखंड उपलब्ध करणे, नेरुळ सेक्टर-५० ई अंतर्गत प्रभाग क्र.१०७ मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तसेच विविध सुविधा पुरविणे यासह असे अनेक विविध प्रश्नांबाबत ‘सिडको'च्या संबंधित अधिकाऱ्यांशी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी चर्चा केली.

दरम्यान, सदर सर्व प्रश्नांवर ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सकारात्मकता दाखवत सदरचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भिवंडी मधील गुन्हेगार, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी