पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील कामांची आ. प्रशांत ठाकूर यांच्याद्वारे पाहणी  

पनवेल : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरु आहेत. या कामांची पनवेल विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीचे पाहणी  करुन कामांचा आढावा घेतला.

याप्रसंगी उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपीळे, ‘भारतीय जनता युवा मोर्चा'चे पनवेल शहर अध्यक्ष सुमीत झुंझारराव, पनवेल रेल्वे स्टेशन मास्तर कृष्णा अग्रवाल, आर. के. नायर, शिवाजी भोसले, अशोक आंबेकर, जरीना शेख, कविता गुप्ता, रविंद्र फास्टे आदी उपस्थित होते.

पनवेल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास अमृत भारत स्टेशन योजना (एबीएसएस) अंतर्गत केला जात आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. पनवेल रेल्वे स्थानकाचा विकास या योजनेचा एक भाग असून, प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा मिळाल्या पाहिजेत, या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामांची पाहणी करत सुचनाही संबधित रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राजू पाटील यांना गावात ६८३ मते; १४४ मतांची आघाडी