‘नवी मुंबई महोत्सव'ला उत्साहात सुरुवात

नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी, सेवटर-१ मधील सुनील गावस्कर मैदान येथे ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव-२०२५'ला उत्साहात प्रारंभ झाला आहे. ‘नवी मुंबई महोत्सव'चे उदघाटन सुप्रसिध्द गायक पद्मश्री शंकर महादेवन आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी ‘श्री गोवर्धनी संस्था'च्या माध्यमातून संत निरंकारी संस्थेला २ व्हील चेयर देण्यात आले.  

सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव'चे आयोजन करण्यात आलेले आहे. ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या वतीने गेली २८ वर्षे समाजपयोगी, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, संगीत आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, तसेच त्यांना एक व्यासपीठ तयार व्हावे या उद्देशाने ‘श्री गोवर्धनी संस्था'च्या वतीने ‘नवी मुंबई महोत्सव'चे आयोजन दरवर्षी करण्यात येते. नवी मुंबईतील हजारो महिला या निमित्ताने एकत्र येऊन आपली कला सादर करतात. त्यामुळे कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण होते. विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा आयोजित करुन त्यांचे मनोबल वाढवले जाते, असे आयोजिका आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच संस्कृतीदर्शक चित्र प्रदर्शन, खाद्य संस्कृती, भव्य फनफेअर या ‘महोत्सव'चे खास आकर्षण ठरणार आहे. तसेच येथील ग्रामसंस्कृती, लोककला आणि लोकपरंपरेचे जतन व्हावे, नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देतानाच जुन्या जाणत्या कलावंतांचा गुणगौरव व्हावा, ग्रामसंस्कृती आणि नागर संस्कृती यांच्यामध्ये वैचारिक आदान-प्रदान व्हावे, सांप्रदायिक एकता आणि एकात्मता वृद्धिंगत व्हावी, हाच उद्देश समोर ठेवून ‘महोत्सव'चे आयोजन करण्यात येते. ‘नवी मुंबई महोत्सव' १० दिवस नवी मुंबईकरांसाठी मेजवानी असणार आहे. या ‘महोत्सव'ला नवी मुंबईकरांनी नवी मुंबईकरांनी भेट द्यावी, असे आवाहन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान, यावेळी सीबीडी सेक्टर-४ येथील व्यापारी संघटनेच्या वतीने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा सत्कारही करण्यात आला. 

याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष सी.व्ही. रेड्डी, बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, महामंत्री डॉ. राजेश पाटील, अनिल कौशिक, माजी नगरसेवक दीपक पवार, माजी नगरसेवक भरत जाधव, बलबीर चौधरी, पंजाब वेलफेअर कल्चरल असो. अध्यक्ष कमल शर्मा, धर्मपाल सिंग, हस्तीमल जैन, नानजी भाई, तन्सुख जैन, दत्ता घंगाळे, राजू तिकोने, पांडुरंग आमले, भावेश पटेल, लालजी बंगारी, गोपाळ गायकवाड, प्रभाकर कांबळे, प्रताप भोसकर, जयश्री चित्रे, कल्पना शिंदे, अश्विनी घंगाळे, उल्का तिकोने, श्रध्दा आमले तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक संसथा'चे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उल्हासनगर मधील प्रलंबित विकासकामे तातडीने सुरु करण्याची मागणी