ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक विजयी

नवी मुंबई : नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघांपैकी एक १५०-ऐरोली विधानसभा मतदारसंघात आ. गणेश नाईक यांनी एकतर्फी विजयश्री खेचून आणली आहे. गणेश नाईक जवळपास ९१९०० मताधिववयाने विजयी झाले आहेत. गणेश नाईक यांना १४४२६१ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले ‘शिवसेना-शिंदे सेना'चे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना ५२३६१ आणि ‘महाविकास आघाडी'चे एम.के. मढवी यांना ३८५७६ मते मिळाली.

या मतदारसंघात ‘महायुती'चे उमेेदवार आमदार गणेश नाईक यांच्यासमोर बंडखोरी करीत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपली अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघात देखील ‘महायुती'चे गणेश नाईक, ‘महाविकास आघाडी'तर्फे ‘शिवसेना'चे मनोहर (एम.के.) मढवी आणि अपक्ष विजय चौगुले यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ऐरोली मतदारसंघात ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना त्यांचेच पूर्वाश्रमीचे शिष्य विजय चौगुले आणि एम. के. मढवी कसे आव्हान देतात, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. पण, यात गुरुने दोन्ही शिष्यांवर मात करीत विजय मिळवला.

ऐरोली मतदारसंघामधये आ. गणेश नाईक नाईक ‘भाजपा'कडूनच निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात ‘महाविकास आघाडी'कडून ‘शिवसेना'चे मनोहर मढवी आणि अपक्ष विजय चौगुले निवडणूक लढत आहेत. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडकीत नाईक यांनी दोन वेळा विजय चौगुले यांचा पराभव केला आहे. विजय चौगुले आणि मनोहर मढवी यापूर्वी गणेश नाईक यांंचे शिष्य राहिलेले असून नाईक यांच्या तालमीतच हे दोघ्ो जण तयार झालेले आहेत. त्यामुळे ऐरोलीत गुरु आणि दोन शिष्यांमध्ये कशी लढत होते? ते पाहणे औत्सुवयाचे ठरणार आहे. याशिवाय ऐरोलीतून ‘मनसे'तर्फे निलेश बाणखेले यांना मैदानात उतरविण्यात आले आहे.

ऐरोली मतदारसंघात आता गणेश नाईक (भाजपा), मनोहर मढवी (शिवसेना), विजय चौगुले (अपक्ष), निलेश बाणखेले (मनसे), अरविंदसिंहराव (बहुजन समाज पार्टी), अमोल जावळे (आरपीआय-ए), अंवुÀश कदम (महाराष्ट्र स्वराज पार्टी), भूपेंद्र गवते (लोकराज्य पार्टी), विक्रांत चिकणे (वंचित बहुजन आघाडी), डॉ. शरद देशमुख (संभाजी ब्रिगेड पार्टी), सचिन मगर (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), रत्नदीप वाघमारे (अपक्ष), राजीव भोसले (अपक्ष), राहुल मेहरोलिया (अपक्ष), शरद जाधव (अपक्ष), सुभाष काळे (अपक्ष) आणि हरिश्चंद्र जाधव (अपक्ष) असे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मध्यमवर्गीय नागरिकांचा जास्त समावेश असलेल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात झोपडपट्टीत राहणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. नवी मुंबई महापालिकेत या मतदारसंघातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या ५७ पैकी जवळपास २० नगरसेवक झोपडपट्टी बहुल भागातील आहेत.

दुसरीकडे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असणारे गणेश नाईक यांनी १९९७ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बिनसल्याने १९९९ मध्ये नाईक यांनी ‘शिवसेना'ला जय महाराष्ट्र करीत शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी'मध्ये सामिल झाले. १९९९ च्या निवडणुकीत ‘शिवसेना'च्या सीताराम भोईर यांच्याकडून गणेश नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. पण, २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी'च्या तिकीटावर सलग दोन वेळा विजय संपादित केला. यानंतर नाईक यांनी २०१९ ‘भाजपा'मध्ये प्रवेश करुन ते ‘महायुती'मधून ऐरोली मतदारसंघातून निवडून आले. पण, आता या निवडणुकीत गणेश नाईक यांनी ‘महाविकास आघाडी'चे एम.के. मढवी आणि अपक्ष विजय चौगुले यांचा पराभव केला.

ऐरोली विधानसभेचा इतिहास पाहिला तर २००९ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे, तेव्हापासून या मतदारसंघावर नाईकांचेच राज्य राहिले आहे. याठिकाणी २००९ आणि २०१४ मध्ये अशी दोन वेळा संदीप नाईक यांनी ‘राष्ट्रवादी'च्या तिकीटावर आमदारकी मिळवली आहे. तर २०१९ मध्ये गणेश नाईक ‘भाजपा'च्या तिकीटावर निवडून आले आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक यांनी ११४,६४५ मते मिळवून ‘राष्ट्रवादी'चे गणेश शिंदे (३६,१५४ मते), ‘मनसे'चे निलेश बाणखेले (२२,८१८ मते) आणि ‘वंचित'चे प्रकाश ढोकणे (१३,४२४ मते) यांचा पराभव केला होता. यावेळी ५,२१३ मतदारांनी नोटाला पसंती दिली होती. सन २०१४ च्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी'कडून लढताना संदीप नाईक (७६,४४४ मते) यांनी ‘शिवसेना'चे विजय चौगुले (६७,७१९ मते), ‘भाजपा'चे वैभव नाईक (४६,४०५ मते) आणि ‘काँग्रेस'चे रमाकांत म्हात्रे (४,१११ मते) यांचा पराभव केला होता.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा अनधिकृत ‘होर्डिंग'चा विळखा!