खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीला तडे

पोलीस ठाण्याचा कारभार नवीन जागेतून

नवीन पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीला तडे जाऊन ती खचल्याने पोलीस ठाण्याचे कामकाज खांदा वसाहती मधील सेक्टर-८ येथील एका खाजगी रो-हाऊसमध्ये करण्यात येत आहे.

खांदा कॉलनी येथे दोन मजली असलेल्या खांदेश्वर पोलीस ठाणेच्या इमारतीमधून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम गेल्या ९ ते १० वर्षापासून सुरु आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीला तडे जाण्याचे प्रमाण वाढू लागले होते. इमारतीला मोठमोठे तडे गेले आहेत. पोलीस ठाण्यातील टाईल्सला तडे जाऊन जमीन थोड्या फार प्रमाणात खाली वर झाली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याची इमारत धोकादायक झाल्याने या पोलीस ठाण्याच्या कारभार आता सेवटर-८ मधील रो-हाऊसमधून सुरु करण्यात आला आहे.

अशा जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये काही दिवस जीव मुठीत ठेवून खांदेश्वर पोलिसांनी कारभार सुरु ठेवला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो, या भितीने खांदेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार नवीन जागेवर हलवण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार खांदेश्वर पोलीस ठाण्याचे काम खांदा कॉलनी, सेक्टर-८ प्लॉट क्र.२७ मधील खाजगी रो-हाऊस मधून सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून पोलीस ठाण्यामधील सामानाच्या शिपटींग करण्याचे कामकाज सुरु आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ; झाडे बनताहेत भक्ष