‘एमआयडीसी'द्वारे सदर भूखंडाची विक्री

उद्यानातील साहित्याची खाजगी विकासकाकडून नासधूस

वाशी : नवी मुंबई महापालिकेने विकसित केलेल्या तुर्भे एमआयडीसी मधील इंदिरानगर येथील उद्यानातील खेळण्यांची खाजगी विकासकाकडून नासधूस करण्यात आली आहे. त्यामुळे सदर विकासकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सदर भूखंडाची ‘एमआयडीसी'ने आता विक्री केली आहे.

तुर्भे एमआयडीसी मधील इंदिरानगर येथील शांताबाई सुतार उद्यान नवी मुंबई महापालिका द्वारे विकसित करण्यात आले होते. सदर भूखंड ‘एमआयडीसी'ने १९९७ साली उद्यानासाठी दिला होता, असे ‘रिपब्लिकन सेना'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल यांचे म्हणणे आहे. १९९७  महापालिका या ठिकाणी विकास कामे करत आली आहे. मात्र, सदर भूखंडावरील वापर बदल करुन ‘एमआयडीसी'ने सदर भूखंडाची विक्री केली आहे. त्यामुळे खाजगी विकासकामार्फत त्या ठिकाणी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. मात्र, सदर काम करताना येथील खेळणी साहित्यावर बुलडोझर फिरवून नासधूस केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी संबधित विकासकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ‘रिपब्लिकन सेना'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खाजामिया पटेल यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे केली आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

२ दिवसात ६० दुचाकीस्वारांवर कारवाई