बस थांब्यांनी घेतला मोकळा श्वास

कोपरखैरणे व घणसोली भागातील बस थांब्यांनी घेतला मोकळा श्वास 

नवी मुंबई : कोपरखैरणे व घणसोली भागातील बस थांबे व त्याच्या आजूबाजूच्या भागात रस्त्यावर वाहने पार्क केले जात असल्यामुळे बस थांब्यावरील प्रवाशांना तसेच पादचाऱ्यांना त्याचा त्रास होत होता. याबाबत नागरिकांकडून कोपरखैरणे वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या जात असल्याने कोपरखैरणे वाहतूक शाखेने सोमवारपासून कोपरखैरणे व घणसोली भागातील बस थांबे व त्याच्या आजूबाजूच्या भागात रस्त्यावर पार्क असलेली वाहने हटवून सदर वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोपरखैरणे व घणसोली भागातील बस थांबे व त्याच्या आजूबाजूचा रस्ता आता मोकळा झाला आहे. कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून बस थांबे व बाजूच्या रस्त्यावरील वाहने काढून रस्ते मोकळे केल्याने कोपरखैरणे व घणसोली भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बस थांबा अथवा त्याच्या आजूबाजूस वाहने पार्क न करण्याचे आवाहन कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. सदर ठिकाणी वाहन पार्क केल्याचे आढळून आल्यास संबधीतावर कारवाई करण्यात येईल असा इशारा कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी विश्वास भिंगारदिवे यांनी दिला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तरुणाला आवरण्यासाठी पोलिसांचा गोळीबार