अमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या बाटल्या घेऊन जाणारी दुक्कली जेरबद 

अमली पदार्थ विरोधी पथकाने बेलापुर येथील किल्ले जंक्शन येथे अमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या बाटल्या घेऊन जाणारी दुक्कली जेरबद

नवी मुंबई : कोडेन फॉस्फेट हा अमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या बाटल्या बेकायदेशिररित्या विक्री करण्यासाठी गोवंडी येथे घेऊन जाणाऱ्या एका महिलेसह दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बेलापुर येथील किल्ले जंक्शन येथे सापळा लाऊन अटक केली आहे. आसमा शिराज सय्यद (३९) व दिलशाद महमंद निजामुद्दीन शेख (२०) अशी यादोघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या कोडेन फॉस्फेट या अमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या ७० हजार ५२५ रुपये किंमतीच्या ४५५ बाटल्या जप्त केल्या आहेत.

बेलापुर येथील किल्ले जंक्शनवरुन काही व्यक्ती रिक्षामधुन कोडेन फॉस्फेट हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासितअली सय्यद व त्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी बेलापुर येथील किल्ले जंक्शन येथे सापळा लावला होता. त्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आसमा सय्यद आणि दिलशाद शेख हे दोघे संशयीत त्याठिकाणावरुन रिक्षामधून जाताना निदर्शनास आले. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांची रिक्षा अडवली.

 त्यांनतर पोलिसांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिशव्यांची तपासणी केली असता, त्यात कोडेन फॉस्फेट हा अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या ४५५ बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत सदर कफ सिरफच्या बाटल्या बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी गोवंडी येथे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यांजवळ असलेल्या ७० हजार ५२५ रुपये किंमतीच्या कोडेन फॉस्फेट या अंमली पदार्थ मिश्रीत कफ सिरफच्या ४५५ बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर त्यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कामोठे गॅस दुर्घटनावेळी महिला पोलिसाची कार्यतत्परता