डायल-११२द्वारे नागरिकांना आपत्कालीन मदत -अपर पोलीस महासंचालक सारंगल

अलर्ट नवी मुंबईकर डायल-११२ जनजागृतीचा शुभारंभ

नवी मुंबई ः पोलिसांनी सुरु केलेली डायल-११२ एक महत्वाकांक्षी योजना असून ती फवत नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारी हेल्पलाईन आहे. आपत्कालीन मदतीकरिता डायल करण्यात येत असलेल्या यापूर्वी १०० नंबर पेक्षा डायल-११२ अत्याधुनिक पध्दतीने तयार करण्यात आली आहे. देशभरातून कोणत्याही ठिकाणाहुन डायल-११२ वर नागरिकांना आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे. अमेरिका मधील डायल-९११ प्रमाणेच डायल-११२ची संकल्पना असून नागरिकांकडून येणारे मदतीचे कॉल आणि पोलिसांकडून त्यानंतर देण्यात येणारा मदतीचा प्रतिसाद यावरच या योजनेचे यश अवलंबून आहे, अशी माहिती डायल-११२ या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यात विशेषत्वाने काम करीत असलेले अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) कुलवंत कुमार सारंगल यांनी दिली. नवी मुंबई पोलीस दलातर्फे नागरिकांच्या आपत्कालीन मदतीकरिता २ एप्रिल २०२२ रोजी कार्यान्वित करण्यात आलेल्या अलर्ट नवी मुंबईकर मोहिमेंतर्गत डायल-११२ या हेल्पलाईनच्या प्रभावी प्रतिसाद सेवेची नागरिकांना विस्तृत माहिती आणि त्याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने डायल-११२ प्रमोशन कार्यक्रमाचे उद्‌घाटन राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. त्यावेळी वाशीतील सिडको एविझबिशन सेंटर सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन बोलत होते. यावेळी डायल-११२च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या वाहनांना सारंगल यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे, सह-पोलीस आयुवत संजय मोहिते, अपर पोलीस आयुवत (गुन्हे शाखा) महेश घुर्ये, पोलीस उपायुवत पंकज डहाणे (परिमंडळ-२), अमित काळे (गुन्हे शाखा), विवेक पानसरे (परिमंडळ-१), संजयकुमार पाटील (मुख्यालय), तिरुपती काकडे (वाहतूक शाखा), पोलीस अधीक्षक (डायल-११२) डॉ. प्रिती टिपरे व्यासपीठावर उपस्थित होते.

शहरी भागातील डायल-११२चा प्रतिसाद कालावधी कमी करण्याबरोबर ग्रामीण भागात डायल-११२ ची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे आव्हानात्मक आहे. परंतु, आमचे पोलीस दल त्यास यशस्वी होतील. गोल्डन अवर (आपत्कालीन वेळी) वेळी नागरिकांना एकात्मिक सेवांसोबत (इंटीग्रेडेट सर्व्हिसेस) पोलीस मदत पोहोचविणार आहोत. नागरिकांनी आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक डायल-११२ वर व्हाईस कॉल, एसओएस, एसएमएस, ई-मेल, वेब विनंती आणि पॅनिक बटनाद्वारे मदतीची विनंती केल्यास तात्काळ विनाविलंब महाराष्ट्र पोलिसांकडून मदत दिली जाणार आहे, असे कुलवंत सारंगल यांनी सांगितले.

दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केलेल्या डायल-११२ या हेल्पलाईनवर वर्षभरात जवळपास १० ते १२ हजार मदतीकरिता पोलीस कंट्रोल रुममध्ये कॉल आले. यातील ३ हजार कॉलला पोलिसांना प्रतिसाद देता आला. पण, ९ हजार कॉल कारवाई करण्यायोग्य नव्हते. त्यामुळे अशा पध्दतीने फेक कॉल करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही अपर पोलीस महासंचालक सारंगल यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सारंगल यांनी नवी मुंबई पोलीस दलातर्फे डायल-११२ सुरु करुन त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करणारे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे आणि पोलीस उपायुवत पंकज डहाणे यांचे जाहीरपणे कौतुक केले.

डायल-११२ नागरिकांना मदत करणारा केद्र शासनाचा उपक्रम असून या उपक्रमाची नागरिकांना विस्तृत माहिती होऊन त्यांच्याकडून डायल-११२ द्वारे आपत्कालीन मदत मिळविली जाईल, तेव्हाच सदर योजना यशस्वी होईल. त्याअनुषंगाने नवी मुंबई पोलिसांच्या वतीने डायल-११२ ची विस्तृत माहिती आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही नागरिकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एक राष्ट्र एक हेल्पलाईन याप्रमाणे अमेरिकाच्या धर्तीवर आपल्या देशात डायल-११२ सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात डायल-११२ सुरु झाले असून ते राज्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असा विश्वास पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी यावेळी बोलनाता व्यवत केला.

पोलिसांच्या १०० क्रमांकाप्रमाणेच डायल-११२ हेल्पलाईन नंबर आहे. डायल-११२ वरील शहरी आणि ग्रामीण भागातील प्रतिसाद वेळेत त्या त्या भागातील लोकसंखेची घनता, भौगोलिक परिस्थितीनुसार बदल राहणार आहे. १०० क्रमांकावरील प्रतिसाद वेळेपक्षा डायल-११२ वरील नवी मुंबई पोलिसांचा प्रतिसाद वेळ ५.२८ मिनिट असून तो आणखी कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. डायल-११२ द्वारे पोलीस, वैद्यकीय आणि फायर या घटकांसह इतर आपतत्कालीन सेवांसाठीची हेल्पलाईनचा वापर करता येणार आहे, असे पोलीसआयुवत भारंबे यांनी सांगितले.

प्रारंभी पोलीस उपायुवत पंकज डहाणे यांनी प्रास्ताविकातून नवी मुंबई पोलिसांतर्फे डायल-११२ हेल्पलाईन २ एप्रिल २०२२ रोजी सुरु करण्यात आली असून जानेवारी २०२३ पर्यंत या सेवेला मिळालेला प्रतिसाद आणि पोलीस मदत यांची माहिती दिली. तरीही आपत्कालीन १०० क्रमांकाप्रमाणे डायल-११२ नागरिकांना म्हणावी तेवढी माहिती नसल्याने या योजनेच्या जनजागृती साठी नवी मुंबईतील वर्दळीची आणि गर्दीची अशा २४ ठिकाणी विविध घटकांच्या माध्यमातून ४१,५०० पोस्टर्स लावणार असल्याचे डहाणे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहाय्यक पोलीस आयुवत भागवत सोनावणे यांनी डायल-११२ च्या संपूर्ण प्रक्रियेची कार्यपध्दती सादरीकरणाद्वारे विषद केली. कार्यक्रमात आभार प्रदर्शन वायरलेस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुवत गिरीश ठाकरे यांनी केले.

सदर कार्यक्रमास नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुवत, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, इतर अधिकारी-पोलीस अंमलदार यांच्यासह नवी मुंबईतील नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी, आदि उपस्थित होते.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 वाशी पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पालकांची केली बोळवण