प्रत्येक पोलीस ठाण्यात लवकरच सायबर सेल -मिलिंद भारंबे

महिला-मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये नवी मुंबई आघाडीवर

 नवी मुंबई ः सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरामध्ये वाढत्या नागरीकरणामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. सन २०२२ या वर्षामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, महिला विषयक गुन्हे, वाहन चोरी, सायबर गुन्हे, मालमत्ता विषयक, प्राणांतिक अपघात, आदि गुन्ह्यांचा आलेख चढता राहिला आहे. महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना चांगले यश मिळाले असले तरी भविष्यात नवी मुंबईतील कायदा-सुव्यवस्था राखतानाच नवी मुंबईकरांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण निर्माण करण्याबाबत पोलीस कटीबध्द असतील, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वार्षिक पत्रकार परिषद मध्ये दिली.

दरम्यान, नवी मुंबईतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी जावू नयेत याकरिता पोलिसांच्या वतीने विशेष लक्ष राहणार असून अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम हाती घ्ोतली जाणार असल्याचे पोलीस आयुवत मिलिंद भारंबे यांनी सांगितले. त्याचबरोबर नवी मुंबईतील वाढत्या मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस दर गांभिर्याने विचार करत असून या शहरात अनधिकृतरित्या वावरणाऱ्या नायजेरियन आणि बांग्लादेशी नागरिकांवर देखील कारवाईचे संकेत पोलीस आयुक्त भारंबे यांनी यावेळी दिले.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयच्या हद्दीत सन २०२२ मध्ये बलात्काराचे २३६ गुन्हे घडले असून या गुन्ह्यांमध्ये सन २०२१ च्या तुलनेत १२ ने वाढ झाली असली तरी यातील सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे लग्नाचे आमिष दाखवून, मित्र अथवा ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा नातेवाईकांकडून झाल्याचे आढळून आले आहे. यातील १३१ बलात्काराचे गुन्हे अल्पवयीन मुलीसोबत घडले आहेत. तर उर्वरीत १०५ गुन्हे सज्ञान मुलीसोबत घडलेले आहेत.

बलात्काराच्या गुन्ह्यांप्रमाणेच विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील ३७ ने वाढ झाली आहे. गतवर्षात २५१ विनयभंगाचे गुन्हे घडले होते, त्यापैकी २३९ गुन्हे उघडकीस आले आहेत. महिला विषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घ्ोण्यात येणार असल्याचे मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

डायल-११२द्वारे नागरिकांना आपत्कालीन मदत -अपर पोलीस महासंचालक सारंगल