ऑटो रिक्षा व ऍक्टीवा चोरणारी सराईत दुक्कली पोलिसांच्या जाळ्यात  

ऑटो रिक्षा तसेच ऍक्टीवा मोटरसायकलची चोरी करणा-या दोन सराईत चोरटयांना एपीएमसी पोलिसांनी केली अटक

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील ऑटो रिक्षा तसेच ऍक्टीवा मोटरसायकलची चोरी करणाऱया दोन सराईत चोरटयाना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. आलम रफिक खान (23) व सलमान इकबाल शेख (25) अशी या चोरटयाची नावे असून त्यांनी विविध भागात केलेले 19 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या चोरटयाकडुन सदर गुह्यातील 10 ऑटो रिक्षा व 11 ऍक्टीवा जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.    

नवी मुंबई शहरात वाहन चोरीच्या घटनात वाढ होत असल्याने या वाहन चोरटयाना पकडण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी दिल्या अहेत. त्यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे व त्यांच्या पथकाकडुन एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ऑटो रिक्षा चोरीच्या गुह्याचा तपास करण्यात येत होता. या तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन सीसीटिव्ही फुटेज मिळवुन त्याचे तांत्रिक विश्लेषण करुन सदर गुन्हयातील वाहन चोरी करणाऱया आरोपींची माहिती मिळविली. 

 वाहन चोरणारे दोन्ही आरोपी हे गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळ्यानंतर पोलिसांनी गोवंडी, मानखुर्द मुंबई परिसरात सापळा लावुन आलम रफिक खान व सलमान इकबाल शेख या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी त्यांच्या इतर साथीदारासह एपीएमसी व कोपरखैरणे, त्याचप्रमाणे समतानगर ,कळवा, मानखुर्द, बिकेसी, गावदेवी, देवनार, डीएन नगर, टिळक नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक ऑटो रिक्षा व ऍक्टीवा चोरल्याची कबुली दिली.  

त्यानुसार पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करुन 10 रिक्षा तसेच 11 होंडा ऍक्टीव्हा मोटारसायकल जफ्त करण्यात आल्या आहेत. या चोरटयानी विविध भागात केलेले 19 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून या चोरटयाकडुन आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या चोरटयानी चोरलेल्या अनेक ऑटो रिक्षाचे पार्ट वेगवेगळे करुन विकल्या आहेत. या चोरटयाचे इतर दोघे साथिदार फरार असून पोलिसांकडुन त्यांचा शोध घेण्यात येत आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पारसिक हिल उतारावरील खोदकामाला बिल्डर दोेषी