एमबीबीएसला ऍडमिशन मिळवून देण्याचे अमिष दाखवुन एका द्क्कुलीने 4 विद्यार्थ्यांची फसवणूक

एमबीबीएसला ऍडमिशन मिळवून देण्याचे अमिष दाखवून फसवणुक  

नवी मुंबई : एमबीबीएसला ऍडमिशन मिळवून देण्याचे अमिष दाखवुन एका द्क्कुलीने 4 विद्यार्थ्यांकडून तब्बल 48 लाख रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. उमेंद्रकुमार सिंग व संदीप सिंग अशी या दुक्कलीचे नाव असून वाशी पोलिसांनी त्यांच्या विरोधात फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या प्रकरणातील फरार झालेल्या आरोपी द्क्कुलीने चार महिन्यापुर्वी वाशी रेल्वे स्टेशन जवळच्या हावरे इन्फोटेक पार्क मधील 19 व्या मजल्यावरील कार्यालय भाडेतत्वावर घेऊन त्याठिकाणी मेरिल व्हेंचर्स प्रा.लि. नावाचे कार्यालय थाटले होते. त्यानंतर या दुक्कलीने मॅनेजमेंट कोटÎातुन एमबीबीएसला ऍडमिशन मिळवुन देण्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरातबाजी सुरु केली होती. तसेच एमबीबीएससाठी ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क साधुन त्यांना ऍडमिशन देण्याचे अमिष दाखविण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान ठाणे येथे राहणारे रॉय परंबल हे आपल्या मुलीला एमबीबीएसचे ऍडमिन मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते.  

याबाबतची माहिती सदर टोळीला मिळाल्यानंतर या टोळीने त्यांना संपर्क साधुन त्यांच्या मुलीला मॅनेजमेंट कोटÎातुन ऍडमिशन मिळवुन देण्याचे अमिष दाखविले होते. त्यामुळे रॉय गत नोव्हेंबर महिन्यात वाशीतील मेरिल व्हेंचर्स प्रा.लि. च्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी आरोपी उमेंद्रकुमार सिंग याने प्रकाश मेडीकल इन्स्टीटÎुट ऍन्ड रिसर्च सेंटर या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटÎातून ऍडमिशन मिळवुन देणार असल्याचे त्यांना सांगितले. तसेच ऍडमिशनची बुकींग अमाऊंट म्हणुन 3 लाख रुपये, 20 लाख रुपये डोनेशन, तसेच कॉलेजची प्रत्येक वर्षाची 4 लाख 84 हजाराची फि द्यावी लागेल असे सांगितले. रॉय यांनी त्याच्या मार्फत ऍडमिशन घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर उमेंद्रकुमार सिंग याने रॉय यांच्याकडुन 3 लाख रुपये घेतले.   

काही दिवसानंतर उमेंद्रकुमार सिंग याने रॉय यांना संपर्क साधुन ऍडमिशनची प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी त्यांना डोनेशनची रक्कम घेऊन सांगलीतील इस्लामपुर येथे येण्यास सांगितले. त्यानुसार गत 9 डिसेंबर रोजी रॉय 20 लाख रुपये घेऊन इस्लामपुर येथे गेले होते. त्याठिकाणी उमेंद्रकुमार सिंग व संदिप सिंग या दोघांनी रॉय त्यांच्याकडे असलेली 20 लाख रुपयांची रक्कम घेऊन कॉलेजमध्ये ऍडमिशनची प्रक्रीया करण्यासाठी जात असल्याचे सांगुन त्याठिकाणावरुन पलायन केले. त्यानंतर दोघांचे फोन बंद झाल्याने रॉय यांनी कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन बाबत चौकशी केली असता, कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटÎातुन ऍडमिशन चालु नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.  

त्यांनतर रॉय यांनी तातडीने मुंबई गाठुन दुस-या दिवशी वाशीतील हावरे इन्फोटेक पार्क इमारतीतील कार्यालयात धाव घेतली. मात्र तेथील कार्यालय बंद असल्याचे आढळुन आले. यावेळी रॉय यांच्याप्रमाणेच फसवणुक झालेले अनेक पालक त्याठिकाणी आल्याचे  त्यांना लक्षात आले. त्यापैकी राजु जोसेफ दोडती यांच्याकडुन 20 लाख, प्रतिभा भोसले यांच्याकडुन 3 लाख व चंद्रकांत मगदुम यांच्याकडुन 2 लाखाची रक्कम ऍडमिशनच्या नावाने उकळण्यात आल्याचे रॉय यांना समजले. त्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऑटो रिक्षा व ऍक्टीवा चोरणारी सराईत दुक्कली पोलिसांच्या जाळ्यात