तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जफ्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची खारघरमध्ये धडक कारवाई  

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी रात्री खारघर सेक्टर-12 मधील एका रो-हाऊसवर छापा मारुन अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने जमलेल्या 10 पुरुष व 6 महिला अशा एकुण 16 नायजेरीयन नागरिकांची धरपकड करुन त्यांच्याकडुन तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किंमतीचे गांजा, चरस, हेरॉईन व मेथाक्युलॉन हे अंमली पदार्थ जफ्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 78 हजाराची रोख रक्कम व 19 मोबाईल फोन देखील जफ्त केले आहेत. या कारवाईत पकडण्यात आलेल्या नायजेरीयन नागरिकांजवळ पासपोर्ट आणि व्हीजा नसल्याचे आढळुन आले. त्यामुळे या नायजेरीयन नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस आणि पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक करण्यात आली आहे.  

थर्टीफस्ट व नवर्षाच्या निमित्ताने आयोजित पाटर्Îांमध्ये गांजा, चरस, हेरॉईन व मेथाक्युलॉन या सारखे अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी काही नायजेरीयन नागरिक खारघर सेक्टर-12 मधील एका रो-हाऊसमध्ये जमणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.सय्यद व त्यांच्या पथकाने गुन्हे शाखेतील इतर युनिटमधील अधिकारी कर्मचा-यांच्या सहाय्याने रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास खारघर सेक्टर-12 मधील संशयित रो-हाऊसवर छापा मारला. यावेळी त्याठिकाणी रात्री 10 पुरुष व 6 महिला असे एकुण 16 नायजेरीयन नागरिक आढळुन आले.  

यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली असता, त्यांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की करुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या सर्वांचा अटकाव करुन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किंमतीचे गांजा, चरस, हेरॉईन व मेथाक्युलॉन हे अंमली पदार्थ आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सदरचे अंमली पदार्थ जफ्त करुन त्यांच्याकडे पासपोर्ट आणि व्हिजा बाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याबाबतचे कोणतेही वैध कागदपत्रे आढळुन आली नाहित. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे रोहाऊसच्या मालकीबाबत चौकशी करण्यात आली असता, सदरचे रोहाऊस नायजेरिया देशाचा नागरिक असलेल्या शंकर याने भाडÎाने घेतल्याचे सांगिलते. त्यानुसार  अमली पदार्थ विरोधी पथकाने शंकर सह 17 नायजेरियन नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे. तसेच भाडÎाने घर घेणा-या शंकरचा शोध सुरु केला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पोलिसांकडुन सिम कार्ड विक्रेत्यांना के.वाय.सी. संबंधातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश