सेलेरियो कार पलटी झाली तर इनोव्हा पडली नाल्यात

पामबीच मार्गावर इनोव्हा आणि सेलेरियो कारमध्ये जोरदार धडक 

नवी मुंबई : पामबीच मार्गे कोपरखैरणेच्या दिशेने जाणाऱया इनोव्हा कारने पामबीच मार्ग ओलांडुन वाशीतील मॉडर्न कॉलेजच्या दिशेने जाणाऱया सेलेरियो कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सेलेरियो कार पलटी होऊन कार चालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वाशीमध्ये घडली. या अपघातात इनोव्हा कार देखील नाल्यामध्ये जाऊन पडली असून एपीएमसी पोलिसांनी या अपघाताप्रकरणी इनोव्हा कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

या अपघातातील जखमी कार चालकाचे नाव चेतन अशोक म्हात्रे (27) असे असून तो भिवंडी येथे राहणारा आहे. तर त्याला धडक देणारा इनोव्हा कार चालक अमय माणिक मोकल (33) हा मुंबईतील शिवडी येथे राहण्यास आहे. गुरुवारी सकाळी अभय मोकल हा आपल्या इनोव्हा कारने शिवडी येथून वाशीमार्गे शिळफाटा येथे कामानिमित्त जात होता. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्याची कार वाशीत आल्यानंतर तो अरेंजा सर्कल येथून पामबीच मार्गावरुन कोपरखैरणेच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. यावेळी चेतन म्हात्रे हा देखील सेलेरियो कार घेऊन एपीएमसीतील के-स्टार हॉटेल जवळुन पामबीच मार्ग ओलांडुन मॉडर्न कॉलेजच्या बाजुने वाशीत जात होता. याचवेळी अमय मोकल याच्या इनोव्हा कारची सेलेरियो कारला जोरदार धडक दिली.  

ही धडक इतकी जबरदस्त होती कि, सेलेरियो कार पलटी होऊन त्यातील कार चालक चेतन म्हात्रे हा जखमी झाला. त्याचप्रमाणे या धडकेनंतर इनोव्हा देखील नाल्यावर असलेली लोखंडी जाळी तोडून नाल्यात जाऊन पडली. या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी आणि वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजुला काढली. या अपघातानंतर एपीएमसी पोलिसांनी इनोव्हा चालक अमय मोकल याच्या विरोधात वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे वाहन चालवुन अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात सेलेरियो कारचे मोठÎा प्रमाणात नुकसान झाले आहे.    

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

विक्की इंगळेच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्तांसह ७ डॉक्टरवर गुन्हा दाखल