वाळू माफियांविरोधात धडक कारवाई

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 

नवी मुंबई : रायगड  जिल्ह्यातील तळोजा, खारघर खाडीमध्ये गुरुवारी वाळु माफीयांविरुद्ध सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४ मोठया बार्ज आणि ४ मध्यम बार्ज व २ छोटया संक्शन पंपच्या बोटी अशा १० बोटींवरती धडक कारवाई करण्यात आलेली आहे.

या कारवाई अंतर्गत खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात ६ बार्ज देण्यात आल्याअसून संबंधितांवर  ४१ डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर २ बोटी एन.आर.आय. पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून संबधिताविरुध्द एन.आर.आय. पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, १ बोट गाळामध्ये फसली असल्याने जागेवरती नष्ट करण्यात आली आहे. तर १ बोट एन.आर.आय. पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच ५ संक्शन पंप नष्ट करण्यात आले आहेत. 

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व  अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या नेतृत्वाखाली ही घडक कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे. कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल पाण्यामधुन जप्त करुन संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती अमोल यादव यांनी दिली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

लोकलमधील प्रवाशांचे मोबाईल फोन खेचणारे दोन लुटारु जेरबंद