बंगाली व्यक्तीच्या डोक्यावर फरशी मारुन त्याची हत्या

सासुसोबत अनैतिक संबध ठेवणा-या व्यक्तीची जावयाने केली हत्या 

नवी मुंबई : तुर्भे नाका येथील उड्डाणपुलाखाली राहणा-या बांगाली व्यक्तीच्या डोक्यावर फरशी मारुन त्याची हत्या करणाऱया दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मोनु राजकुमार दिक्षीत (33) व हेमेंद्र फेकु गुफ्ता (38) अशी या दोघांची नावे मृत बंगाली व्यक्तीची मोनु दिक्षीत याच्या सासुसोबत अनैतिक संबध असल्याच्या रागातून या दोघांनी ही हत्या केल्याचे तपासात आढळुन आल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

या घटनेतील मृत 40 वर्षीय बंगाली व्यक्ती एपीएमसी मार्केटकडुन तुर्भे स्टोअर्स, नाक्याकडे जाणाऱया उड्डाणपुलाखाली एकटाच राहत होता. सदर बंगाली व्यक्ती हा गत 22 डिसेंबर रोजी सकाळी उड्डाणपुलाखाली मृतावस्थेत आढळुन आला होता. सदर बंगाली व्यक्तीच्या डोक्यात फरशी व विटांनी मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचे आढळुन आल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकऱयाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर शिउरकर, अशोक डमाळे व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासात, बंगाली व्यक्तीचे  तुर्भे नाका परिसरात राहणा-या व्यक्तीसोबत अनैतिक संबध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  

त्यानुसार पोलिसांनी गुफ्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीं मोनु दिक्षीत व हेमेंद्र गुफ्ता या दोघांना संशयावरुन ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. बंगाली व्यक्तीचे मोनुच्या सासुसोबत अनैतिक संबध होते, ही बाब मोनुला खटकत होती. गत 21 नोव्हेंबर रोजी मोनु व त्याचा मित्र हेमेंद्र हे दोघे बंगाली व्यक्तीकडे गेले असताना, त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. या वादातुन मोनु आणि हेमेंद्र या दोघांनी बंगाली व्यक्तीच्या डोक्यात फरशी व विटांने मारहाण करुन त्याची हत्या करुन पलायन केले होते. अशी माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

४० लाख रुपयांच्या दागिन्यांच्या लुट प्रकरणातील फरार आरोपी अटकेत