पोलिस उपनिरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखूवन केले लैंगीक अत्याचार

नवी मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने बदनामी करण्याची धमकी देवून तसेच लग्नाचे आमिष दाखूवन लैंगीक अत्याचार केल्याची तक्रार एका महिला पोलिस उपनिरीक्षकाने केली आहे. या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी सदर पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणात गुन्हा दखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव अनिकेत गुलाबराव शिंदे (29) असे आहे. शिंदे यांची नेमणूक मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्यात असून सध्या ते मुंबईतील क्युआरटी पथकात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराची आरोप करणारी 30 वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक नवी मुंबईत कार्यरत आहे. सदर महिला पोलीस उपनिरीक्षक 4 वर्षांपूर्वी नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात असताना अनिकेत शिंदे यांनी पोलीस प्रशिक्षणादरम्यान या महिला पोलीस उपनिरीक्षकासोबत प्रेम संबंध निर्माण केले. 

त्यानंतर अनिकेत शिंदे यांनी बदनामी करण्याची धमकी देवून तसेच लग्नाचे आमिष दाखूवन नाशिक शहरातील वेगवेगळया लॉजमध्ये, तसेच मुंबई, नागपुर व घणसोली येथील रूमवर लगट करून आपल्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध निर्माण केल्याचा आरोप महिला पोलिस उपनिरिक्षकाने केला आहे. मागील काही महिन्यांपासून अनिकेत शिंदे यांनी या महिला पोलीस उपनिरीक्षकाला टाळण्यास व त्यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिल्यानंतर या महिला पोलिस उपनिरिक्षकाने त्यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अद्याप अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

उत्तरप्रदेश प्रमाणे नवी मुंबईत सुध्दा गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर