एपीएमसी मार्केट आणि कळंबोलीतील खिडुकपाडा भागात एकुण 6 पॉन शॉपवर छापे

नवी मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा-या पान शॉपची झाडाझडती सुरु केली असून या पथकाने गत आठवडÎात एपीएमसी मार्केट आणि कळंबोलीतील खिडुकपाडा भागात असलेल्या एकुण 6 पॉन शॉपवर छापे मारुन हजारो रुपये किंमतीचा प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा जफ्त केला आहे. तसेच या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने सर्व पान शॉप सील करुन सहा पान शॉप चालकांवर एपीएमसी आणि कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.  

पेण येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील पथकाने 3 नोव्हेंबर रोजी सकाळी  11 च्या सुमारास सहाय्यक आयुक्त (अन्न) ल.अं.दराडे, अन्न सुरक्षा अधिकारी वि.वि.शिंदे व स.रा.आढाव व त्यांच्या पथकाने कळंबोली खिडुकपाडा येथील तीन पान शॉपवर छापे मारले. यात रामदुलारे प्रजापती पान शॉप, श्रीराम जेस्वाल पान शॉप, आणि खजांची प्रसाद गौड पान शॉप या तीन पान शॉपचा समावेश होता. या तिन्ही पान शॉपच्या तपासणीत प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळुन आला. त्यामुळे सदर पथकाने गुटखा व पान मसाल्याचा साठा जफ्त करुन त्यांचे शॉप सिल केले. त्यानंतर रामदुलारे प्रजापती (28), श्रीराम जेस्वाल (49) आणि खजांची प्रसाद गौड (48) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

या कारवाईप्रमाणेच ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी अ.द.खडके व त्यांच्या पथकाने गत 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एपीएमसीच्या फळ मार्केटमधील मे.रिद्धी सिद्धी पान शॉप व मे.श्री पान महल तसेच एपीएमसी वाहतुक शाखेजवळ असलेल्या मे.कफे अन्नपुर्णा या तीन पान शॉपवर छापे मारुन त्यांची तपासणी केली. यावेळी तिन्ही पान शॉपमध्ये प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला व सुगंधित टोबॅको विक्री करण्यासाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तिन्ही पान शॉपमधुन हजारो रुपये किंमतीचा प्रतिबंधीत असलेला गुटखा व पान मसालाचा साठा जफ्त करुन त्यांचे शॉप सिल केले. तसेच संदीपकुमार वर्मा (26), मासुम इमामउद्दीन अली (35) व सुरज रामेंद्र सिंग (28) या तिघांना ताब्यात घेतले आहे. 

या सहा पान शॉप चालक विरोधात कळंबोली आणि एपीएमसी पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पान मसाल्याची विक्री करणाऱया पान शॉप चालकांवर यापुढे देखील अशाच पद्धतीने कारवाई सुरु राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

2 लाखाची लाच स्विकारणा-या अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी खाजगी व्यक्तीसह एसीबीच्या जाळ्यात