संवादाच्या अभावामुळे सेक्सटॉर्शन सारख्या गुन्ह्यात वाढ  

सेक्सटॉर्शनच्या गुह्यात अडकणाऱया तरुणांचे प्रमाण अधिक 

नवी मुंबई : आधी सोशल मिडीयावरुन मैत्री.....त्यानंतर व्हिडीओ कॉलिंगवरुन चॅटींग करताना लैंगिक भावना चाळवुन समोरील व्यक्तीला नग्न होण्यास सांगुन तो फोन रेकॉर्ड करणे.. त्यानंतर जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीचे नग्न व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करणे.... सेक्सटॉर्शनचे असले प्रकार सध्या सर्वत्र वाढु लागले आहेत. सेक्सटॉर्शनच्या प्रकाराला बळी पडलेल्या काही तरुणांनी आत्महत्या देखील केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोशल मिडीया हाताळताना खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत सायबर तज्ञांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.  

सेक्सॉर्टशनच्या प्रकारात सायबर गुन्हेगार बनावट प्रोफाईल तयार करतात, त्यानंतर ते अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते समोरील व्यक्तींना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. तसेच व्हिडीओ कॉल करत नग्न होण्यास सांगुन तो फोन कॉल रेकॉर्ड करतात. एकदा त्यांच्याकडे असे व्हिडीओ किंवा फोटो रेकॉर्ड झाल्यानंतर ते संबधितांना सदर व्हिडीओ पाठवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर त्यांचे नग्न व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतात. सेक्सटॉर्शनच्या या प्रकाराला तरुणच नाही तर वयस्कर व्यक्ती देखील सध्या बळी पडत आहेत. अनेकांनी या सायबर गुन्हेगारांच्या धमकीला घाबरुन त्यांना खंडणी स्वरुपात लाखो रुपये दिले आहेत. तर अशाच सेक्सटॉर्शनला बळी पडलेल्या व सायबर गुन्हेगारांच्या धमकीला घाबरलेल्या पुण्यातील दोन तरुणांनी नुकतेच आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.  

लैंगिक आकर्षणामुळे सेक्सटॉर्शनसारख्या गुह्यात अडकणाऱया तरुणांची संख्या ही सगळ्यात जास्त असून यात 19 ते 27 वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कामाचा ताण, एकटेपणा आणि सोशल मीडियावरुन होणारी घुसमट यातून मार्ग काढण्यासाठी अनेक तरुण अशा प्रकारच्या जाळ्यात आपसुक ओढले जातात. तसेच लैंगिक आकर्षणामुळे मुलींसोबत सेक्स चॅट करतात. अशा तरुणांना सायबर गुन्हेगार हेरून त्यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडुन लाखो रुपये उकळत असल्याचे अनेक गुन्ह्यात आढळुन आले आहे. सेक्सटॉर्शनला बळी पडलेले अनेक जण बदनामीच्या भितीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात नसल्यामुळे सेक्सटॉर्शनचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे देखील आढळुन आले आहे.  

सायबर चोरट्यांनी काही दिवसापुर्वीच सीबीडी परिसरात राहणाऱ्या एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिला अज्ञात महिलेच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करुन अश्लिल चॅटींग केली होती. तसेच रेकॉर्डींग केलेला व्हिडीओ ज्येष्ठ नागरिकाला पाठवुन सदरचे अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच सदर व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी या ज्येष्ठ नागरिकाकडून एकुण १ लाख २७ हजार रुपये उकळुन त्यांची फसवणुक केली आहे. सीबीडी पोलिसांनी या प्ररकरणातील सायबर गुन्हेगाराविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीएमसी मार्केट आणि कळंबोलीतील खिडुकपाडा भागात एकुण 6 पॉन शॉपवर छापे