सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय

नगरपालिका-महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

नवी मुंबई ः राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार असल्याबाबत काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन