इंटरनेट बार ॲण्ड रेस्टोरन्टवर मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास छापा

आसुडगांव येथिल इंटरनेट बारवर छापा

नवी मुंबई : नियमाचे उल्लंघन करत सुरू असलेल्या खांदा कॉलनी आसुडगांव सेक्टर-4 मधील इंटरनेट बार ॲण्ड रेस्टोरन्टवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक काक्षाने  मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास छापा मारुन महिला वेटर व ग्राहक आशा एकूण 49 जणांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. 

खांदा कॉलनी आसुडगांव सेक्टर - 4 मधील इंटरनेट बार ॲण्ड रेस्टोरेन्ट मध्ये बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवाड यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला सदर बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने गत 25 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास आसुडगांव सेक्टर-4 मधील इंटरनेट बार ॲण्ड रेस्टोरेन्ट या बारवर छापा मारला. यावेळी सदर बारमध्ये महिला वेटर कडून अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी बार मधील 22 महिला वेटर, 20 ग्राहक, त्याचप्रमाणे 7  पुरुष वेटर, मालक आणि मॅनेजर अशा एकूण 49  जणांना  ताब्यात घेतले. या सर्वावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात भादवी कलम 294, 34 सह महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे आणि मदयपान कक्ष यामधील अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणा-या महिलाच्या प्रतिष्ठेचे संरक्षरण करण्याबाबत अधिनियम 2016 कलम 38 (1) (2) (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

घणसोलीत महिलेने केली स्वत:च्या दोन्ही मुलांची हत्या