माजी नगरसेविका सौ.रेखा म्हात्रे यांचा वाढदिवस अध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा

नवी मुंबई ः करावे गांवच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच करावे गावातील सर्व ग्रामस्थांना आरोग्य, दीर्घायुष्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी करावे गांवच्या माजी नगरसेविका सौ. रेखा विनोद म्हात्रे यांच्या सुवर्ण महोत्सव वाढदिवसाचे औचित्त साधून माजी नगरसेवक विनोद म्हात्रे आणि करावे ग्रामस्थांच्या वतीने १५ ऑवटोबर रोजी धार्मिक-अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये करावे गांवातील श्री विठ्ठल-रुविमणी मारुती मंदीर येथे श्री सत्यनारायण महापुजा, गीता पारायण, हरिपाठ, भजन संध्या असे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी करावे गावातील जवळपास तीन हजारहुन अधिक ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतानाच सौ. रेखा म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. रेखा म्हात्रेे यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी करण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर नाईक, सुधाकर म्हात्रे, विनीत पालकर, माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील, सौ. कल्पना संजीव नाईक, सौ. रेखा म्हात्रे यांची कन्या सौ. काजल सागर नाईक यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना काळात मागची दोन वर्षे लोकांनी खूप संघर्ष केला. त्यातून लोक आता कठे  सावरत आहेत. त्यामुळे करावे गांवच्या सर्वांगिण विकासासह सर्व ग्रामस्थांना आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी पत्नी सौ. रेखा यांचा वाढदिवस धुमधडावयात साजरा न करता, तो आत्याध्मिक कार्यक्रमाने साजरा केला, असे माजी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सांगितले. तसेच सौ. रेखा म्हात्रे यांनी किमान त्यांच्या वयाच्या पंचाहत्तरी पर्यंत तरी अशाप्रकारे गांवची समाजसेवा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कंत्राटी, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कोव्हीड भत्ता द्या; अन्यथा आंदोलन