‘नवी मुंबई इंटक'चा पाठपुरावा यशस्वी

नवी मुंबई ः आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगार यांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे यासाठी ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेवून सफाई कामगारांच्या समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ‘नवी मुंबई इंटक'च्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासन आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगारांच्या सानुग्रह अनुदानासाठी ऑल ग्लोबल सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीच्या खात्यात अंदाजे १ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम टाकणार असून ठेकेदार सदर रक्कम सफाई कामगारांना वितरीत करणार आहे.


महापालिकेत ईएमजी या कंपनीच्या माध्यमातून महापालिका आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणारे वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, नेरूळ-तुर्भे-ऐरोली येथील माता-बाल रुग्णालयातील सफाई कर्मचारी ईएमजी या कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पध्दतीने काम  करत होते. ठेकेदार बदली होत असतात; पण कामगार प्रशासनातच काम करत असतात. ईएमजी कंपनी आपले कंत्राट सोडून मध्येच निघून गेली आहे. तत्पूर्वी या कंपनी व्यवस्थापनाकडून कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण करण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतनही या कंपनीकडून वेळेवर करण्यात आलेले नाही, अशी बाब रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवतांच्या निदर्शनास आणून दिली. आता नवीन ठेकेदार आला असून कर्मचारी त्या माध्यमातून प्रशासनात कार्यरत आहेत. ठेकेदार कंत्राट अर्ध्यावर सोडून जातो, यामध्ये कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नसतो. कर्मचारी ठेकेदारी कितीही बदली झाले तरी प्रशासनात कंत्राटी कामगार काम करतच असतात. ईएमजी कंपनीच्या माध्यमातून वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, नेरुळ-तुर्भे-ऐरोली येथील माता-बाल रुग्णालयातील सफाई कर्मचारी कंपनी कंत्राट अर्ध्यावर सोडून गेल्यावरही काम करत असल्याने या कर्मचाऱ्यांनाही महापालिका प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सानुग्रह अनुदान देणे आवश्यक आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याविषयी प्रशासनाला कामगार नेते रविंद्र सावंत यांनी लेखी निवेदनातून तसेच प्रत्यक्ष भेटीगाठीतून साकडे घातले होते.


दरम्यान, ‘नवी मुंबई इंटक'च्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने आणि महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिवत आयुवत संजय काकडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, आदिंच्या सहकार्याने कामगारांना सानुग्र अनुदान मिळणार आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माजी नगरसेविका सौ.रेखा म्हात्रे यांचा वाढदिवस अध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा