‘आप'तर्फे कांदा-बटाटा मार्केट पक्ष प्रचार रॅली

नवी मुंबई ः ‘आम आदमी पार्टी-नवी मुंबई'च्या वतीने घणसोली  वॉर्ड अध्यक्ष दत्तुजी संकपाळ यांच्या सहकार्याने एपीएमसी मधील कांदा-बटाटा मार्केट येथेे पक्ष प्रचार रॅली १७ ऑवटोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीवेळी ‘आप'च्या कार्यकर्त्यांनी ‘आम आदमी पार्टी'ची धेय-धोरणे याबाबत घोषणा देऊन पत्रके वाटली.

‘आप'च्या सदर रॅलीला कांदा-बटाटा व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी, वाहतूक व्यावसायिक आदिंचा सक्रिय प्रतिसाद मिळाला. आता आम्ही पारंपरिक राजकारणातील भ्रष्टाचाराला कंटाळलो असून, देशाला अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप'सारख्या एकमेव पक्षाची गरज आहे, अशी अपेक्षा यावेळी मार्केट मधील घटकांनी व्यवत केली.

‘आप'च्या सदर रॅलीसाठी स्थानिक पोलीस आणि एपीएमसी प्रशासनाने केलेल्या सहकार्यासाठी ‘आप'चे नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी आभार मानले. सदर रॅलीप्रसंगी ‘टीम आप नवी मुंबई'च्या उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, मुख्य ट्रेड युनियन समन्वयक देवराम सुर्यवंशी, ऐरोली नोड महिला अध्यक्ष आरती सोनावणे, ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष चिन्मय गोडे, नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे मिलिंद सावंत यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील विविध प्रयोजनासाठी भूखंड मिळण्याची मागणी