मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर संपन्न

पनवेल : प्रथा आणि परंपरेने सर्व समाजाची सातत्याने निस्वार्थीपणे सेवा करण्याचे काम रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर त्यांचे सहकारी आणि पक्ष करीत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज खांदा कॉलनी येथे केले.

         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.  या अंतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १६ ऑक्टोबर खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात १३ वे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर संपन्न झाले.  या महाशिबिराचे उदघाटन नामदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी नामदार रवींद्र चव्हाण बोलत होते. 

          या महाशिबिरास प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध डॉ. गिरीश गुणे, डॉ. समीर सहस्त्रबुद्धे,  तसेच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, युवा नेते विनोद साबळे, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदेश पाथरे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, खारघर भाजप अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, संदीप पाटील, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, विजय चिपळेकर, राजू सोनी, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, अमर पाटील, मुकीत काझी, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका सुशीला घरत, दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, नीता माळी, कुसुम म्हात्रे, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, कल्पना ठाकूर, हेमलता म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, शशिकांत शेळके, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सचिव मन्सूर पटेल, डॉ. संतोष आगलावे, डॉ. कृष्णा देसाई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘आप'तर्फे कांदा-बटाटा मार्केट पक्ष प्रचार रॅली