सिद्राम ओहोळ यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदाची जवाबदारी

सिद्राम ओहोळ ‘आरपीआय'चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, नवी मुंबई प्रभारी नियुक्त

नवी मुंबई ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांची ‘आरपीआय'चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा नवी मुंबई प्रभारी-निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री तथा ‘आरपीआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते १३ ऑवटेाबर रोजी सिद्राम ओहोळ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

सिद्राम ओहोळ यांनी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष असताना नवी मुंबईत पक्ष वाढवण्याबरोबरच विविध सामाजिक आंदोलन, मोर्चे, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न सामाजिक प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षात केले आहेत. या कार्याची दखल घ्ोत ‘आरपीआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी सिद्राम ओहोळ यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदाची जवाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर नवी मुंबई जिल्हा प्रभारी तथा निरीक्षक अशी अतिरिक्त जबाबदारी देखील त्यांना देण्यात आली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

प्रारुप विकास आराखडा