वाशी गावात 12 वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
मोबाईलवर खेळण्यावरुन आई ओरडल्याचा राग मनात धरुन 12 वर्षीय मुलीची आत्महत्या
नवी मुंबई : वाशी गावात राहणाऱया सबिकुन नाहर या 12 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सबिकुन हिने दुसऱया व्यक्तीचा मोबाईल फोन घेऊन ती त्यावर खेळत असल्यामुळे तिची आई तिला रागावली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन सबिकुन हिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
या घटनेतील मृत सबिकुन नाहर ही मुलगी वाशी गावात वडील फिरोज जियादअली मंडल व आई मोहमा बिबी व लहान भाऊ यांच्यासह मधुकर पाटील यांच्या बिल्डींगमध्ये भाडÎाच्या खोलीत राहत होती. दोन दिवसापुर्वी सबिकुन हिने तिच्या कुटुंबाच्या ओळखीतील जावेद नावाच्या व्यक्तीचा मोबाईल फोन घेऊन तो हाताळण्यास सुरुवात केली होती. हे सबिकुनची आई मोहमा बिबी हिला पटले नव्हते. त्यामुळे ती सबिकुन हिला रागावली होती. त्या दिवसापासून सबिकुन हि नराज झाली होती. या गोष्टीचा सबिकुन हिला देखील राग आला होता. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सबिकुन हिची आई व भाऊ बाजारात गेले होते.
यावेळी घरात एकटीच असलेल्या सबिकुन हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाजारात गेलेली सबिकुनची आई घरी परतल्यांनतर तिला घरात सबिकुन गळफास घेतलेल्या स्थितित आढळुन आली. त्यानंतर तिच्या आईने तिला शेजाऱयांच्या मदतीने वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 12 वर्षीय मुलीने अशा पद्धतीने आई ओरडल्याचा राग मनात धरुन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.