हद्दपार केलेल्या एम.के.मढवी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल  

नवी मुंबई : मुंबई उपनगर व ठाणे या दोन जिह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले ऐरोलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के.मढवी यांच्या विरोधात रबाळे पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मढवी यांना गत 30 सफ्टेंबर रोजी हद्दपारीच्या आदेशाची प्रत देण्यासाठी गेलेल्या पोलिसांसमोर मढवी यांनी आरडा-ओरड करुन हद्दपार आदेशाची प्रत घेण्यास नकार दिला. तसेच पोलिसांची अडवणुक करुन त्यांना शासकीय कायदेशीर काम करु न दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी रबाळे पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावानंतर शिवसेनेचे ऐरोलीतील माजी नगरसेवक एम.के.मढवी यांना गत 7 ऑक्टोबर रोजी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्हयातून 2 वर्षासाठी हद्दपार केले आहे. मढवी यांना हद्दपार करण्यापुर्वी त्यांना हद्दपारीचे आदेश बजावण्यासाठी रबाळे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात व त्यांचे पथक गत 30 सफ्टेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास ऐरोलीतील मजुद्दीन शाळेसमोरील मैदानात आयोजित नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी गेले होते.  

त्याठिकाणी मढवी यांनी नवात्रोत्सवासाठी जमलेल्या जमावासमोर अवाजावी धमकीवजा आरडा-ओरड केली. तसेच त्यांनी आपले कार्यकर्ते व महिलांना पुढे करुन हद्दपार आदेशाची प्रत घेण्यास नकार देत पोलिसांची अडवणुक करुन त्यांना शासकीय कायदेशीर काम करु दिले नाही. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात यांनी स्वत: फिर्यादी होऊन एम.के.मढवी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सफाई कामगार महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन मोटारसायकलवरुन लुटारुंचे लुटून पलायन