शिंदे गटाची नवी मुंबईची कार्यकारणी जाहीर
शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचे नेरूळ मध्ये लोकार्पण
नवी मुंबई -:शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर पहिली शाखेचे उद्घाटन झोपडपट्टी पुनर्वसन सभापती विजय नाहटा व माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते नवी मुंबईमधील नेरूळ येथे करण्यात आले. तर मध्यवर्ती शाखेच्या उद्घाटनानंतर नवी मुंबईची कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुक आयाेगाच्या निर्णयानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा दाेन गटात शिवसेना विभागली गेली आहे. दाेन्ही गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येत आहे. दाेन्ही गट एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं बाळासाहेबांची शिवसेना या त्यांच्या सेनेची पहिली शाखा नवी मुंबईत नेरूळ येथे उघडली. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर पहिली शाखा नवी मुंबईत उघडल्यानंतर या शाखेची कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची नवी मुंबईची कार्यकारणी जाहीर झाली आहे.त्यात पक्षाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी विजय चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बराेबरच संपर्क प्रमुखपदी किशोर पाटकर यांची ,उपजिल्हाध्यक्षपदी सुरेश कुलकर्णी तसेच शिवराम पाटील यांच्यासह सहा जणांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं शाखा स्थापनेत आघाडी घेतल्याचे दिसून येत असून उर्वरित नियुक्त्या दिवाळीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती विजय नाहटा यांनी दिली..