विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा भव्य मेळावा

नवी मुंंबई ः ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे' पक्षाची महाप्रबोधन यात्रा आज १३ ऑवटोबर रोजी नवी मुंबईत येणार असून सायंकाळी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसैनिकांचा भव्य मोळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार राजन विचारे आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या तोफा धडाडणार आहेत. दरम्यान, ठाणे शहरात ‘महाप्रबोधन यात्रा'चा शुभारंभ होऊन तीन दिवस उलटल्यानंतर लगेचच नवी मुंबईत शिवसैनिकांचा मेळावा पार पडत असल्याने ना. एकनाथ शिंदे गट आणि भाजपवाल्यांच्या पायाखालील वाळू सकरली आहे. या मेळाव्यात शिवसेना नेते सत्ताधाऱ्यांचे आणि गद्दारांचे काय वस्त्रहरण करणार याकडे संपूर्ण नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


‘शिवसेना'चा महाप्रबोधन यात्रा मेळावा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता सुरु होणार आहे. नवी मुंबईतील हजारो शिवसैनिक या मेळाव्यासाठी येणार आहेत. यावेळी प्रमुख वक्त्यांसह ठाणे लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख सुधाकर देशमुख, नवी मुंबई संपर्कप्रमुख आप्पा पराडकर आदिंची उपस्थिती राहणार आहेत. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी ‘शिवसेना-नवी मुंबई'च्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख वि्ील मोरे यांनी १२ ऑवटोबर रोजी वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये दिली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, उपशहरप्रमुख नरेश चाळके, विभागप्रमुख विजय चांदोरकर, उपविभागप्रमुख संदीप पवार आदि उपस्थित होते.
यावेळी शिवसैनिकांनी वाशी शाखेत मशाल पेटवून गद्दारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
 

पद जाऊ द्या, सर्व सैरावैरा धावतील...
‘शिवसेना-नवी मुंबई'मध्ये जे बाहेरुन आले होते, ते गद्दारांच्या कळपात गेले आहेत. निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीच्या मागे खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे, तोपर्यंतच ते तिकडे आहेत. एकदा पद जाऊ द्या, जे गेलेत ते सर्व सैरावैरा धावताना दिसणार आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी यावेळी दिली.

जाणाऱ्याला लागते निमित्त...
शिंदे गटात जाणाऱ्या प्रत्येकाला काहीना काही निमित्त लागत आहे. तसेच निमित्त विजय नाहटा यांनी शोधून काढले आहे. पक्षप्रमुख  मुख्यमंत्री असताना ते भेटत नव्हते, असा कांगावा त्यांनी आयोजित पत्रकार परिषदमध्ये केला. त्यात काहीच तथ्य नाही. पक्षप्रमुख भेटले नसते तर त्यांना उपनेते पद आणि दोन-दोन महामंडळे भेटली असती का? असा प्रश्न जिल्हाप्रमुख वि्ील मोरे यांनी उपस्थित करुन शिंदे गटाचे सर्व आरोप खोडून काढले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवीन पनवेल येथील डम्पिंग ग्राउंडमुळे अनेक प्रकारच्या समस्या