महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या विविध आस्थापनेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिकेतील विविध आस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी लेखी निवेदन सादर करताना चर्चेदरम्यान समस्यांचा, असुविधांचा पाढा वाचत कर्मचारी व अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. चर्चेदरम्यान आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देताना कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देताना सकारात्मक प्रतिसाद दिला.

नवी मुंबई महानगरपालिकेत विविध आस्थापनेत व संवर्गात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या प्रलंबित आहे. प्रशासन त्या समस्या सोडविण्याकडे व सुविधा उपलब्ध करून देण्याकडे काणाडोळा करत असल्याचेही कामगार नेते रविंद्र सावंत यांनी चर्चेदरम्यान पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

संबंधित समस्या नवी मुंबई इंटककडून आयुक्तांसमोर मांडण्यात आला. समस्येचे गांभीर्य व कर्मचाऱ्यांची होत असलेली ससेहोलपट पाहता संबंधितांना या समस्येचे तातडीने निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. 

यावेळी सावंत यांनी चर्चेदरम्यान कार्यरत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या निदर्शनास आणून देताना सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिंदे गटाची नवी मुंबईची कार्यकारणी जाहीर