विकास आराखडा संदर्भात आ.मंदाताई म्हात्रे यांनी घेतली आयुक्त नार्वेकर यांची भेट

नवी मुंबई ः ‘बेलापूर'च्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या विकास आराखडा संदर्भात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ.राजेश पाटील, विजय घाटे, माजी नगरसेवक संपत शेवाळे, अशोक गुरखे, दीपक पवार, बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, ‘भाजपा युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, किशोर नाईक उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबईतील प्रत्येक गावाला स्वतंत्र मैदान उपलब्ध व्हावे, नवी मुंबईतील पूर्ण झालेल्या कामांची लोकार्पण करणे, महापालिकांची हॉस्पिटले पूर्णपणे सुविधांनी सुरु करणे, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे भगवान गौतम बुध्द यांचा पुतळा उभारणे, नवी मुंबईतील सुख-सोयी सुविधांवर जास्तीत जास्त भर देण्यात यावा अशा विविध विषयांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. तसेच नवी मुंबई शहराच्या प्रारुप विकास आराखडा संदर्भात शेवटचा माणूस समाधानी होत नाही तोपर्यंत विकास आराखडा मंजूर करु नये, अशी सूचना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांना केली. सांगितले. त्यावर आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रक्रियेत मी स्वतः जातीने लक्ष घालून काम पाहीन, असे सूचित केले.

महापालिकेने प्रारुप विकास आराखडा सादर केला. परंतु, विकास आराखडा पाहिल्यास त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. ज्या ग्रामस्थांनी आपल्या १०० % जमिनी दिल्या त्या ग्रामस्थ खेळाडूंना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान नाही. त्याअनुषंगाने आयुक्तांना भेटून डीपी प्लॅन मधील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. डीपी प्लॅन मधून नागरिकांची कशा पध्दतीने दिशाभूल केली जात आहे, त्यावर कशा पध्दतीने मार्ग काढता येतील, त्या सूचना महापालिका प्रशासनाला करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनासह पुन्हा सविस्तर चर्चा करुन नागरिकांच्या हक्काच्या सेवा, ग्रामस्थांच्या सोयी-सुविधा यांवर भर देऊन तसेच उद्यान, मैदाने याबाबतीत नियमावली तयार करावी. नवी मुंबई शहरातील प्रत्येक माणूस समाधानी होईल, असा विकास आराखडा तयार करण्याची मागणी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच्या जनतेला दिलासा देणार असून याबाबतीत आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘इंटक'च्या पाठपुराव्याने घनकचरा विभागातील सुपरवायझर्सना कोव्हीड भत्ता