महापालिकेच्या शहर विकास आराखडा  संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेने जाहिर केेेलेल्या प्रारुप विकास आराखड्याबाबत महापालिकेनेच जनजागृती करावी अशी मागणी घेऊन महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नवरात्रौत्समध्ये नवी मुंबई बचाव अंतर्गत जागर जनजागृती अभियान सुरु केले आहे. याअंतर्गत दशरथ भगत यांनी महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी महापालिकेच्या शहर विकास आराखडा  संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केेला आहे. याच जागर जनजागृती अभियान अंतर्गत दशरथ भगत आज ५ ऑवटोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी  ५ वाजेपर्यंत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

एमआयडीसी आणि मूळ गांव, गांवठाण विस्तार क्षेत्रात विकास नियोजन करावे. प्रारुप विकास आराखड्याबाबत नवी मुंबई महापालिकेनेच नागरिकांच्या  जनजागृतीसाठी प्रथम मार्गदर्शन आणि प्रेजेंटेशनसह वार्ड स्तरावर शिबिरे घ्यावीत. महापालिकेने नागरिकांना प्रथम सांगावे मग हरकती-सूचना मागावे, यासाठी दशरथ भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडली आहे. जोपर्यंत नागरिकांना विकसित आणि अविकसित जागा-भूखंड, तसेच विविध सुख-सुविधांकरिता सूचना-हरकती घेेण्याबाबत माहितीच देण्यात आलेली नाही. तोपर्यंत नागरिक हरकती-सूचना कसे देतील ? म्हणून मार्गदर्शन आणि प्रेजेंटेशनसह महापालिकेने वार्ड स्तरावर शिबिरे प्राधान्याने घेण्यात यावेत. जे नोड (विभाग) नवी मुंबई महापालिकडे हस्तांतरीत झाले आहेत, त्या भू-भागावर तसेच महापालिका क्षेत्रांतर्गत महापालिकाच नियोजन प्राधिकरण आहे. आणि ती कायम रहावी, नागरिकांचे महापालिका नियोजन प्राधिकरण हक्क ‘सिडको'ने हिसकावून घेऊ नये तसेच ‘सिडको'ने विक्री केलेल्या भूखंडाना बांधकाम परवानगी देऊ नये, अशी मागणी दशरथ भगत यांनी केली आहे. 

महापालिकेच्या प्रारुप विकास आराखडा संदर्भात जनजागृतीसाठी नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून दशरथ भगत यांनी नवी मुंबई बचाव अभियान पामबीच-सोनखार, बेलापूर, सीवुडस्‌, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे, ऐरोली आणि घणसोली येथे राबविले. या अभियानाला नागरिकांचा देखील उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच अगोदरच जाहिर केल्याप्रमाने दशरथ भगत आज ५ ऑवटोबर रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे  लाक्षणिक उपोषण करणार आहेत. तसेच जागर जनजागृती अभियान अंतर्गत विविध ठिकाणी नागरिकांकडून प्राप्त झालेले हरकती-सूचना यांचे अर्ज उद्या ६ ऑवटोबर रोजी महापालिका प्रशासनाकडे जमा करण्यात येणार आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 विकास आराखडा संदर्भात आ.मंदाताई म्हात्रे यांनी घेतली आयुक्त नार्वेकर यांची भेट