सेवानिवृत्त व मयत कामगारांच्या वारसांना जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे सेवा उपदान

पनवेल :  विष्कर इन्फ्रास्ट्रक्चर (आय.ओ. टी. एल. धुतूम) च्या सेवानिवृत्त व मयत कामगारांच्या वारसांना जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे सेवा उपदान (ग्रॅज्युटी) मिळवून दिल्याबद्दल कामगार प्रतिनिधींनी कामगार नेते जितेंद्र घरत यांचे आभार मानले. 

  उरण तालुक्यातील धुतूम येथे असलेल्या आय.ओ.टी.एल अंतर्गत विष्कर इन्फास्ट्रक्चर या ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कामगारांचा सेवा उपदानाचा ( ग्रॅज्युटी)  प्रश्न प्रलंबित होता. वारंवार ठेकेदार बदलत असल्यामुळे कामगार सेवानिवृत्त झाला किंवा एखादा कामगार मयत झाल्यास त्या कामगारांना सेवा उपदान कोणी द्यायचा हा प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित होता. मात्र जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर व अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी प्रमुख मालक आय.ओ.टी.एल. चे व्यवस्थापन अधिकारी मिलिंद मोघे यांच्यासोबत चर्चा करून सदर सर्व कामगारांना त्यांचा सेवा उपदान मिळावा यासाठी आग्रह धरला, त्यानंतर प्रमुख मालक, व्यवस्थापनाने सदरची मागणी मान्य करून सेवा निवृत्त झालेले कामगार कृष्णा आत्माराम पाटील, सदाशिव भरत ठाकूर, विकास धनंजय ठाकूर, हरिश्चंद्र राजाराम घरत, अर्जुन पोशा ठाकूर, बबन नानोसा संकपाळ यांना तर मयत कामगार प्रविण शंकर ठाकूर, श्याम यशवंत घरत यांच्या वारसदारांना सेवा उपदान देण्यात आले. यावेळी कामगार प्रतिनिधी शशिकांत ठाकूर, अर्जुन ठाकूर, ज्ञानेश्वर ठाकूर, चंद्रकांत कद्दू, बबन संकपाळ, तसेच संघटनेचे सचिव रविंद्र कोरडे उपस्थित होते. महत्वपूर्ण अशा या चर्चेमुळे कामगारांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाले असून निवृत्त कामगार तसेच मृत कामगारांच्या वारसांनी आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत यांचे आभार मानले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिकेच्या शहर विकास आराखडा  संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न