जल हि  जीवन  जनजागृती रॅली  

 

 खारघर :   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरवाडा या उपक्रमाअंतर्गत  रामशेठ   ठाकूर पब्लिक स्कूलच्या वतीने  शालेय विद्यार्थ्यांची शनिवारी जल ही जीवन  जनजागृती  रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत  माजी सभागृह नेते. परेश ठाकुर, खारघर तळोजा भाजपा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष  दिलीप जाधव, माजी नगरसेवक  शत्रुघ्न काकडे, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, भरत कोंढाळकर, शैलेंद्र त्रिपाठी, मंदार मुंबईकर सहभागी झाले होते. यावेळी परेश ठाकूर यांनी शालेय विद्यार्थाना  पाणी हा घटक सजीव सृष्टी साठी किती महत्वाचा आहे  या विषयी माहिती दिली.   सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त पिण्यासाठीच नव्हे तर इतर अनेक कामासाठी पाण्याचा वापर करत असतो. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावे असे सांगितले. तसेच भाजपच्या विविध सेक्टर मधील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झाडू मारून स्वच्छता केली. 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सेवानिवृत्त व मयत कामगारांच्या वारसांना जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे सेवा उपदान