भाजप महिला मोर्चा पनवेल व खांदा कॉलनी यांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन

सेवा पंधरवड्यानिमित्त पनवेल परिसरात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण

पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत शनिवारी नवीन पनवेलमध्ये आरोग्य शिबिर आणि खांदा कॉलनीत वृक्षारोपण आयोजित करण्यात आलेे होते. या दोन्ही ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सेवा पंधरडवड्यानिमित्त नवीन पनवेल सेक्टर 2 येथील कर्नाटक हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. शिबिरात ब्लड प्रेशर, ईसीजी, रक्त तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक गरजूंनी याचा लाभ घेतला.

या शिबिरावेळी पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारूशीला घरत, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समितीचे माजी सभापती समीर ठाकूर, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, उद्योजक महेंद्र वावेकर, प्रभाग अध्यक्ष शिवाजी भगत, युवा अध्यक्ष मयूर आंग्रे, बूथ अध्यक्ष देवेंद्र पर, बाबू घाडीगावकर, कुलबिरसिंह चंडोक, संदीप जाधव, तन्मय बिर्जे, विवेक होन, रिमा रावल, यमुना प्रकाशन, किरण सिंह यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

भाजप महिला मोर्चा पनवेल व खांदा कॉलनी यांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खांदा कॉलनीत झालेल्या या उपक्रमावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, भाजप महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, सरचिटणीस निता माळी, सदस्य निता मंजुळे, झोपडपट्टी सेल पनवेल शहर अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, महिला मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे, सरचिटणीस आशा मुंडे, उपाध्यक्ष सानिका इंदुलकर, सचिव संध्या जाधव, प्रेमा भोपी, खजिनदार सोनाली सावंत, सदस्य शैला मोरे, रिमा करगुटकर, सीमा निकम, सुनीता गुरव, वरिजा गुजरान, अनिता घाडगे, कांती शेट्टी, विनोदा शेट्टी, मंदाकिनी यादव, खांदा कॉलनी प्रभाग 15 अध्यक्ष शांताराम महाडिक, सरचिटणीस भीमराव पवार, संजय कांबळे, कामगार संघटनेचे अध्यक्ष मोतीराम कोळी, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष गोपीनाथ मुंडे चिटणीस, दीपक जांभळे, सचिन मोरे, प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते युवराज बेरसे, अनिकेत काथारा, अमोल घायाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र नित्यानंद प्रभाकर म्हात्रे यांची निवड