उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र नित्यानंद प्रभाकर म्हात्रे यांची निवड

पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्ष पदी नित्यानंद म्हात्रे

उरण : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम सातत्याने व प्रामाणिकपणे करत पक्षाचे विचार ध्येय व धोरणे तळागाळात जनतेपर्यंत पोहोचविणारे व काँग्रेस पक्षाचे कार्य जिद्दीने व निष्ठेने करणाऱ्या उरण तालुक्यातील आवरे गावचे सुपुत्र नित्यानंद प्रभाकर म्हात्रे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खा.सोनियाजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित पाटिल,जिल्हा वरीष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र पनवेल काँग्रेस भवन येथे दिनांक 27/9/2022 रोजी नित्यानंद म्हात्रे यांना देण्यात आले.यावेळी प्रताप गावंड,विकी पाटील, विनया पाटील, महेंद्र गावंड,विकास गावंड आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. उरणचे सुपुत्र, काँग्रेसचे एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्ते नित्यानंद म्हात्रे यांची पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वंयरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, डॉ भक्तीकुमार दवे, माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत , विधी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष के .एस. पाटील, जी आर पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, नातेवाईक, मित्र परिवारानी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

टीम आप नवी मुंबई आणि आप युवा सन्घटने तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रेलचेल