घणसोली मध्ये ‘मनसे'च्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानला उस्फुर्त प्रतिसाद

घणसोलीमध्ये ४ दिवसांत ७००हुन अधिक ‘मनसे'चे नवीन सदस्य


नवी मुंबई ः घणसोली मध्ये ‘मनसे'ची प्राथमिक सदस्य नोंदणी सुरु असून या नोंदणीला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मत मनसेचे रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे यांनी व्यक्त केले.


‘मनसे'ंचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे येथील ‘मनसे'च्या मध्यवर्ती कार्यालयात प्रथम सदस्य होत सदर सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रसैनिकांना सदस्य नोंदणी वअभियान जोमाने घेण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांच्या सदर आदेशाचे पालन करत घणसोली येथे ‘मनसे'च्या रस्ते-आस्थापना विभागातर्फे सदस्य नोंदणी सप्ताह अभियानाला सुरुवात करण्यात आली. २० सप्टेंबर रोजी पासून सुरु झालेल्या या अभियानाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
‘मनसे'च्या वतीने घणसोली, सेक्टर-७ आणि ९ च्या चौकात, घणसोली गावातील मुख्य चौक आणि तळवली गावातील दत्त मंदिर प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले. या सदस्य नोंदणी अभियानला ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी भेट देत पदाधिकारी-कार्यकर्त्यांना नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विलक्षण उलथापालथ झाल्यामुळे मराठी अस्मिता आणि तेजस्वी हिंदुत्वाच्या विचारांची परंपरा कायम तेवत ठेवण्याचे कार्य राज ठाकरे करीत आहेत. त्यामुळेच एका प्रचंड विश्वासाने नागरिक मनसे पक्षात सहभागी होत असून याचा आनंद असल्याचे गजानन काळे यांनी यावेळी सांगितले.


‘मनसे'चे प्राथमिक सदस्य होण्याकरिता डिजीटल माध्यमाचा उपयोग करण्यात आलेला आहे. स्कॅन कोडच्या माध्यमातून अथवा ८८६०३००४०४ या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून आलेल्या लिंक वर क्लिक केल्यास आपली वैयक्तिक संपूर्ण माहिती भरुन ‘मनसे'चे सभासद होता येवू शकते. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ‘मनसे'च्या वतीने नोंदणीच्या ठिकठिकाणी बॅनर लावून आणि नागरिकांना हस्तपत्रके वाटून अभियान बाबत जनजागृती केली जात आहे. त्यासाठी ‘मनसे'चे घणसोली विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण, रोहन पाटील, नितीन नाईक यांच्यासह विभागातील इतर सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्रसैनिक मेहनत घेत आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी काम करण्याचे आदेश