प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी काम करण्याचे आदेश

नवी मुंबई ः ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या नवी मुंबई शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी संदेश डोंगरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर नियुक्ती ‘मनसे विद्यार्थी सेना'चे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशाने करण्यात आलेली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच यापुढील वाटचाल करण्याबाबतचे आदेश संदेश डोंगरे यांना नियुक्ती पत्रात देण्यात आलेले आहेत. तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना सामोरे जात त्याची सोडवणूक करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाचा मार्ग देखील स्वीकारुन सदैव कार्यरत रहावे. यापुढे महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी झपाटून काम करण्याचे आदेश अमित ठाकरे यांनी सदर नियुक्ती पत्रामधून दिले आहेत.

दरम्यान, नवी मुंबईतील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शिक्षण संस्था यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ‘मनसे'ची नवी मुंबई विद्यार्थी सेना कायम कटीबध्द असेल, अशी प्रतिक्रिया संदेश डोंगरे यांनी सदर नियुवतीनंतर दिली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे नवी मुंबईत वितरण