पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सीबीडी येथे अन्नदान

अन्नदान हेच श्रेष्ठदान -आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त फोर्टी-प्लस क्रिकेट असोसिएशन सीबीडी-बेलापूर, एकम किसान संस्था आणि समाजसेवक परमजीत सिंग चहल यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी, सेक्टर-६ येथे ‘अन्नदान'चे
आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्‌घाटन ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अशोक गुरखे, साबू डॅनियल, दर्शन भारद्वाज, सरिता चौधरी, यशपाल सिंग बागल, प्रभाकर कांबळे, संजय ओबेरॉय, आरती राऊळ, रवी ठाकूर, ममता सिंग, हस्तीमल, तनसुख पटेल तसेच इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी शेकडो नागरिकांनी ‘अन्नदान'चा लाभ घ्ोतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सुरु आहे. आम्ही त्यानिमित्त महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीरांचे आयोजन केले. त्यानंतर सीबीडी येथे अन्नदान कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्याचा शेकडो नागरिक लाभ घ्ोतल्याने आनंद होत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. शीख समाज बांधवांकडून अन्नदान होणे, नवी गोष्ट नाही. गुरुद्वारा मध्ये नेहमी लंगर ठेवले जाते. जनतेची सेवा करणे एक स्वतःचा हक्क समजून देशसेवेत ते नेहमी पुढे राहतात. येत्या ४ महिन्यात सीबीडी येथील नागरिकांसाठी शीख बांधव रुग्णवाहिकाही सुरु करणार असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 घणसोली मध्ये ‘मनसे'च्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानला उस्फुर्त प्रतिसाद