भाजप-शिंदे सरकारने आपल्या दुटप्पी कारभाराचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध

वेदांतग्रुप व फॉक्सकाँन कंपनी पुन्हा आणावी म्हणून निवेदन

नवी मुंबई : बेलापूर:वेदांतागृप व फोक्सकॉन कंपनीच्या माध्यमातुन  सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रूपयाची गुंतवणूक होणार होती त्या संदर्भात जुलै २०२२ पर्यंत चर्चा सुरू होती. परंतु हीच गुंतवणुक गुजरात राज्यात करण्याचा निर्णय भाजप-शिंदे सरकारने आपल्या दुटप्पी कारभाराने घेण्यास भाग पाडले आहे. सदर प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १ ते १.५९ लाख  तरुणांना मिळणारा रोजगार गेला आहे. तसेच  महाराष्ट्र राज्याला आर्थिक दृष्ट्या मजबुत होण्यासही मदत झाली असती.तो प्रकल्प पुन्हा राज्यात आणावा.या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोकण विभाग आयुक्तांना दिले असल्याची माहिती नवी मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अन्नू आंग्रे यांनी दिली.

सदर प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी फोक्सकॉन -वेदांत गृप यांना निमंत्रीत करावे. तसेच अशा असंवेदनशील सरकार च्या निष्काळजीपणामुळे ईथुन पुढे महाराष्ट्रविरोधी कृती घडल्यास राज्यातील युवक तीव्र आंदोलन करून सरकार ला बेजार करू असा इशारा देखील राष्ट्रवादी काँग्रेसने कोकण आयुक्तांना दीलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन देताना प्रदेश सरचिटणीस  प्रशांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष  नामदेव भगत, नवी मुंबई कार्याध्यक्ष  जी.एस.पाटील, नवी मुंबई युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे प्रदेश युवक सचिव रेहमान सय्यद, सौरभ काळे, नवी मुंबई युवक कार्याध्यक्ष नितीन चव्हाण, पनवेल जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद बागल, रणजित नरुटे, प्रशांत सोळसकर, तसेच नवी मुंबई, उरण, पनवेल, उलवे विभागातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकण आयुक्तांना भेटण्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधकाऱ्यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा निषेध केला.घोषणा दिल्या.त्यानंतर कोकण आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

Read Previous

 ‘लवाद’च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंशत: स्थगिती

Read Next

प्रारुप विकास आराखडा एक गडद रहस्य