सीबीडी मधील मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई ः पंतप्रधान नरेंरंेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून सीबीडी, सेवटर-३ मधील येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे १७ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर महाआरोग्य शिबिराचे उद्‌घाटन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक प्रभाकर कांबळे, लक्ष्मण मार्के आणि बाविस्कर यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १२३१ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन यांच्या सहकार्याने तसेच हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल-वाशी, स्पार्कस्‌ लाईफ केयर, साईदृृष्टी आय हॉस्पिटल-सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर महाआरोग्य शिबीर करण्यात आले होते. शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला, मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच मोफत औषधे, टुथपेस्ट आणि मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी माजी सभापती डॉ.जयाजी नाथ, संपत शेवाळे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, साबु डॅनियल, स्वाती गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, अशोक नरबागे, ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री डॉ.राजेश पाटील, विजय घाटे, ‘युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, महामंत्री तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, गोपाळ गायकवाड, प्रताप मुदलीयार, राजेश राय, जयश्री चित्रे, स्मिता सावंत, आरती राऊळ, किरण वर्मा, संजय ओबेरॉय, शशी भानुशाली, चैताली ठाकूर, शीतल जगदाळे, देवयानी मुकादम, जसविंदर कौर, अमर जीत कौर, अलका कामत, समीर मनोरे तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सदर मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य सेवा हिच ईश्वर सेवा असून बेलापूर मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी प्रभागांमध्ये आरोग्य शिबीरे घेवून
पंतप्रधान मोदीयांचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा आम्ही नागरिकांना आरोग्य सेवा देत आहोत. संपूर्ण बेलापूर मतदारसंघात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असल्याचे आमदार सौ.
मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘राष्ट्रवादी-ओबीसी सेल'तर्फे ‘कृतज्ञता मेळावा' संपन्न