अशोक गावडे यांचा शिंदे गटात प्रवेश

अशोक गावडे शिंदे गटात

नवी मुंबई ः ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षांतराच्या प्रतिक्षेत असलेल्या माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अशोक गावडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विजय नाहाटा आणि माजी विरोधी पक्षनेते विजय चौघुले यांच्या सहकार्याने नवी मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये १५ सप्टेंबर रोजी प्रवेश केला. अशोक गावडे यांच्यासोबत माजी नगरसेविका ॲड. सपना गावडे-गायकवाड, ‘राष्ट्रवादी'चे माजी जिल्हा कमिटी सदस्य अजित सावंत, दीपक सिंग, नितीन काहीरे, दीपक शिंदे, संतोष भोर, सुधीर कोळी, प्रशांत ठोसर, सामाजिक न्याय सेलच्या अध्यक्षा सरिता कांबळे, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, रवी ढोबळे, मोहन पाडळे, हेमंत पाटील, नियाज शेख, महेश विरदार, अरुण कांबळे, आदि पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, गेली अनेक वर्षे नवी मुंबईकरांसाठी चालू असलेला समाजसेवेचा वसा असाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली इथून पुढे देखील असाच चालू राहील, असे अशोक गावडे यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘काँग्रेस'च्या मागणीमुळे ‘इंडियन स्वच्छता लीग'चा कार्यक्रम स्थगित